महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole Criticized BJP: राज्यात माणुसकीचे रक्तपात करण्याचे काम सुरू- अकोला दंगलीवरून नाना पटोले यांची भाजपवर टीका

By

Published : May 18, 2023, 12:35 PM IST

राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचे काम सुरू झाले असल्याचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते. अकोला दंगल प्रकरणी मला जी माहिती प्राप्त झाली आहे, ती माहिती किती खरी आणि खोटी हे जाणून घेण्यासाठी मी आज अकोला येथे जात असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले आहे.

Nana Patole Criticized BJP
नाना पटोले

राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचे काम सुरू- नाना पाटोले

नागपूर :अकोला आणि अहमदनगरमध्ये रविवारी दंगली झाल्या होत्या. त्यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. गुन्हे दाखल झाले होते. अकोल्यामध्ये तर संचारबंदीदेखील लागू करण्यात आली होती. या दंगलीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दंगल प्रकरणाची शहनिशा करण्यासाठी ते आज अकोल्यात जाणार आहे. भाजप सरकार धर्माच्या नावाखाली जनतेत तेढ निर्माण करत आहे, त्यामुळे सर्वांना संयम पाळण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

भाजप सरकार माणुसकीचे रक्तपात करण्याचे काम करत आहे. लोकांनी संयम पाळावा, यासाठी मी अकोल्यामध्ये आवाहन करणार आहे.- कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षनाना पटोले

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा :संजय राऊत ह्यांच्या हक्कभंगावर जी प्रोसेस असेल, ती होईल. संवैधनिक व्यवस्थेचा कसा वापर केला जातोय, हे आपण पाहत आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असे चित्र तयार केले जात आहे. महाराष्ट्रात काय चालले आहे? अकोला प्रकरणात जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. उध्दव ठाकरे गटाने बैठकीत लोकसभेच्या 20 जागा मागितलेल्या नाहीत. मेरिटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. त्यासाठी 3-3 लोकांची समिती केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्या-त्या स्थितीनुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असे नाना पटोले म्हणाले आहेत.


भाजपला सत्तेची लालसा : केंद्राच्या इशाऱ्यावर वीज प्रकल्प लादले जात आहेत. नवीन सरकार नागपुरात वीज प्रकल्प आणत आहे. इथे औष्णिक वीजनिर्मिती होत असल्याने विदर्भात कॅन्सर रुग्ण वाढत आहे. शेती खराब होत असताना केंद्राच्या इशाऱ्यावर हे प्रकल्प आणण्यात येत आहे. भाजपला सत्तेची लालसा आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून भाजप सरकार चालवत आहे. भाजपचे लोकं सत्तापिपासू आहेत. म्हणून जेपी नड्डा मुंबईत पुढील महापौर आमचा असल्याचे सांगत असल्याची त्यांनी टीका केली.


हेही वाचा :

  1. Karnataka New CM Siddaramaiah: कधीकाळी जनता दलाचे नेते ते काँग्रेसमधील तत्वनिष्ठ नेते सिद्धरामय्या, असा आहे कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास
  2. JP Nadda Maharashtra Visit: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक
  3. Siddaramaiah Elected As New CM : कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला; अखेर सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ

ABOUT THE AUTHOR

...view details