महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut : बेळगावचा भाग केंद्रशासित करावा, मुख्यमंत्री शिंदे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही-संजय राऊत

By

Published : Dec 7, 2022, 10:10 AM IST

Updated : Dec 7, 2022, 12:10 PM IST

Sanjay Raut
संजय राऊत ()

मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत. पण, त्याचा काय फायदा? गृहमंत्र्यांना येथील प्रश्न माहित नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी शिवसेनेचे सरकार घालविले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.

मुंबई: मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला जाणार ( Sanjay Raut Slammed Shinde gov ) आहेत. पण, त्याचा काय फायदा? गृहमंत्र्यांना येथील प्रश्न माहित नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी शिवसेनेचे सरकार घालविले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. इतके हतबल सरकार पाहिले नाही. सरकार नामर्दासारखे बसले आहे. बेळगावचा भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी ( Sanjay Raut over Karnataka border issue ) असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री नामर्द आहेत, असेही राऊत यांनी म्हटले. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत

दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. उठ मराठ्या उठ!" असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी बेळगाव सीमा वादावर केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.


यांनी दिल्लीच पायपुसण केलंयावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचं सरकार कुणाच्याही नावानं चालूद्या महाराष्ट्राच्या अस्मितेची, जमिनीचं रक्षण करणं जमलं नाही त्या सरकारनं एकही दिवस सत्तेवर राहणं गरजेचं नाही. प्रतिकार करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं जातंय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला जातायत पण गरज काय? नामर्द सरकार. विरोधीपक्षानं अशा वेळा लढाई केलीय, मुळात ३ महिन्यापासून या सरकारनं दिल्लीचं पायपुसणं केलंय. अशा प्रकारची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती.



दोन मंत्र्यांनी शेपूट घातलंपुढे बोलताना राऊत म्हणाले की, "दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं. डरपोक सरकार आहे, जनतेची काळजी नाही. सीमा कुरतडल्या जातायत. कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यात स्वतः घुसून दादागिरी करतो, स्वतःला भाई बोलता ना? मग दाखवा भाईगिरी. मेघालय आसाम सीमेचाही वाद सुरूय. ताबडतोब हा भाग केंद्रशासित करा या सरकारला एकही मिनिट सत्तेत राहण्याचा हक्क नाही. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला नाजूक करायचं, प्रकल्प गुजरातला पाठवायचे. तोंडाला कुलुप लावलंय का?



हुतात्मे द्यायला आम्ही तयारमर्दनगी दाखवा या महाराष्ट्राला नाहीतर राजीनामा द्या. हे ढाल तलवारीच्या लायकीचे नाहीत यांना कुलुप चिन्ह दिलं पाहिजे. केंद्राकडून टेंडर घेऊन आलेलं सरकार आहे. महिन्याला कितीचं टेंडर निघतं आकडा आहे माझ्याकडे. काय करणार मला परत तुरुंगात टाकाल! अनेक दिग्गजांनी या साठी प्राण सोडले, इथे बसून टीका करता, महाराष्ट्र पेटला ना त्याला जबाबदार गृहमंत्री असतील केंद्रातले, १०६ हुतात्मे हवेत ना यांना आम्ही तयार आहोत.



केंद्र सरकार प्रश्न का सोडवत नाहीमहाराष्ट्रात कर्नाटकात भाजपचंच सरकार आहे हे तुम्हाला दिसत नाही? जर केंद्र स्वतःला मोठं समजतंय बाप आहे तर का प्रश्न सोडवत नाही? बोम्मई पण ओरिजिनल भाजपचे नाहीत, काॅंग्रेसमधून आलेला माणूस. सर्व राज्या्नी एकत्रित राहणं गरजेचंय आहे. आम्ही आमच्या हक्काचीच गोष्ट करतोय, ही मानवतेची लढाई आहे. बेळगावच्या आसपास जिथं अत्याचार सुरू आहे. महाशक्तीला सांगा हिंमत असेल तर याला केंद्रशासित प्रदेश बनवा.



नामर्द मुख्यमंत्री झाला नाहीतुमच्यासारखा नामर्द मुख्यमंत्री झाला नाही. हे डरपोक आहेत. काय कराल तुरुंगात टाकाल? आम्ही घाबरत नाही. हवं तर घाबरलेल्या मंत्रियांना आम्ही सुरक्षा देऊन नेतो. नुसत्या भेटीगाठी करून चालणार नाही, महाराष्ट्राचं नुकसान झालं. एसटी बसेस रोखणं गरजेचं नव्हतं. याची काही गरज नव्हती, सर्वांना त्याचा त्रास होतोय." अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे


बेळगावचा दौरा :सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोट जतसह विविध ४० गांवावर दावा केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. हा वाद पेटला असतानाच कर्नाटकने जत गावात पाणी सोडून महाराष्ट्र सरकारला डीवचले. कर्नाटक सरकारच्या सततच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्यासाठी समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची समिती नेमली. या समितीने शनिवारी 3 डिसेंबर रोजी बेळगावचा दौरा करण्याचे जाहीर केले. मात्र स्थानिकांच्या मागणीमुळे दोन दिवसांपूर्वी हा दौरा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले (Belgaum Visit over Maharashtra Karnataka dispute) होते.

Last Updated :Dec 7, 2022, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details