महाराष्ट्र

maharashtra

Sai Resort case : सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या कोठडीत 2 जूनपर्यंत वाढ

By

Published : May 17, 2023, 4:54 PM IST

जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. दापोली येथील साई हॉटेल बांधकाम हे बेकायदा पद्धतीने झाले असल्याचा आरोप सक्तवसुली संचनालयाने ठेवलेला आहे. यात आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्यामध्ये सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांचा सहभाग असल्याचे आरोपपत्र ईडीने दाखल केले आहे.

Sai Resort case
जयराम देशपांडे आणि सदानंद कदमच्या कोठडीत वाढ

मुंबई : बहुचर्चित आणि कथित दापोली येथील साई हॉटेल बांधकाम हे बेकायदा पद्धतीने झाले असल्याचा आरोप सक्तवसुली संचनालयाने ठेवलेला आहे. यात आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्यामध्ये सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांचा सहभाग असल्याचे आरोपपत्र सक्त वसुली संचालनालयाने दाखल केले आहे. त्यानंतर दोघांनी जामिनासाठीचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केला होता. मात्र दोन जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली गेली आहे.

ईडीने जामीनला दिला होता नकार : न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ही सुनावण्यात 2 जून रोजी होणार आहे. जामीनवरील सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे कदम व जयराम देशपांडे यांची न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. सक्त वसुली संचलनालयाने सदानंद कदम यांचा अनिल परब यांनी जे दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम केले. त्यामध्ये महत्वाच सहभाग आहे आणि त्यासंदर्भात नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जयराम देशपांडे जो की माजी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर देखील आरोप पत्र निश्चित करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींच्या वतीने जामिनासाठी आज अर्ज केला गेला होता. ईडीच्या वकिलांनी मागील सुनावणीस त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. काही काळ त्यांनी युक्तिवाद मांडला की "कदम आणि देशपांडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये ",अशी विनंती न्यायालयाला केली होती.

आपल्या पदाचा गैरफायदा घेतला : जयराम देशपांडे यांनी त्यांच्या कार्यकाळात दापोलीतील मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील 64 रिसॉर्टला बेकायदेशीर एनए परवानगी दिली होती. त्यामुळे साई रिसॉटर्सची परवानगी रद्द करण्यात आली होती. दरम्यान देशपांडे यांना अटक होण्यापूर्वी महसूल खात्याने त्यांना निलंबित केले होते

हेही वाचा -

  1. Trimbakeshwar temple entry row: त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा राज्यातील मंदिरे दोन दिवस बंद -हिंदू महासभा
  2. Bride Refused To Marry Dark Groom : 'नवरा सावळा आहे', वधूने लग्न मंडपातच दिला लग्नाला नकार
  3. NIA Raids On Gangsters Nexus Case : गँगस्टर खलिस्तानी टेरर प्रकरणी दिल्ली-एनसीआरमधील 32, पंजाबमधील 65 तर राजस्थानमध्ये 18 ठिकाणी छापेमारी

ABOUT THE AUTHOR

...view details