NIA Raids On Gangsters Nexus Case : गँगस्टर खलिस्तानी टेरर प्रकरणी दिल्ली-एनसीआरमधील 32, पंजाबमधील 65 तर राजस्थानमध्ये 18 ठिकाणी छापेमारी

author img

By

Published : May 17, 2023, 12:17 PM IST

NIA Raids On Gangsters Nexus Case

गँगस्टर खलिस्तानी टेरर प्रकरणी एनआयएने दिल्ली, पंजाब, राजस्थानसह पाच राज्यात छापेमारी केली आहे. या छापेमारीत एनआयएचे अधिकारी परदेशात दहशतवादी संघटनेत होणाऱ्या भारतीय तरुणांच्या भरतीचे रॅकेटचा छडा लावणार आहेत.

नवी दिल्ली : गँगस्टर खलिस्तानी टेरर लिंक प्रकरणी एनआयएने पाच राज्यात छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत गुन्हेगारी टोळ्यांसह गँगस्टर खलिस्तानी टेरर लिंकमध्ये अडकलेल्या आरोपींच्याही मुसक्या आवळण्यात येत आहेत. परदेशातील दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांनी भारतातील संघटीत गुन्हेगारीतील माफियांची भरती करत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. याप्रकरणी एनआयएने ही छापेमारी सुरू केली आहे. एनआयए आज दिल्लीतील 32, पंजाबमधील 65 आणि राजस्थानमधील 18 ठिकाणी ही छापेमारी करत आहे.

परदेशातील दहशतवादी करत आहेत गुन्हेगारांची भरती : एनआयएने NIA गेल्या वर्षी तीन प्रकरणे नोंदवली होती. यात परदेशातील दहशतवादी संघटना आणि त्यांचे समर्थक हिंसक गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी भारताच्या उत्तरेकडील राज्यांमधील संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांची भरती करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. दहशतवादी, अंमली पदार्थ तस्कर आणि माफिया यांचे नेटवर्क सीमापार शस्त्रे, स्फोटके आणि आयईडीसह इतर दहशतवादी कारवाया करत आहे. दहशतवादी मोठ्या प्रमाणात आंतरराज्य कार्टेल निर्मिती आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, दारुगोळा पुरवण्यात गुंतलेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांची ही तस्करी रोखण्यासाठी एनआयएने मोठी कारवाई हाती घेतली आहे.

  • National Investigation Agency (NIA) is conducting searches at more than 100 locations in six states-Haryana, Punjab, Rajasthan, UP, Uttarakhand and MP in terror-narcotics smugglers-gangsters nexus cases. pic.twitter.com/SG4QY0VOEo

    — ANI (@ANI) May 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एनआयएने केली शस्त्र पुरवठादारांना अटक : एनआयएने देशभरातील पाच राज्यात छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत एनआयएने माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केले आहे. एनआयएला परदेशातील दहशतवादी संघटना भारतीय संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या माफियांची संघटनेत भरती करत असल्याची माहिती मिळाल्याने एनआयएने ही छापेमारी सुरू केली. एनआयएने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत विविध गुन्हेगारी टोळ्यांचे 19 सदस्य, दोन शस्त्र पुरवठादार आणि नेटवर्कशी संबंधित फायनान्सर यांना आधीच अटक केली आहे.

  • National Investigation Agency (NIA) is conducting searches at more than 100 locations in six states-Haryana, Punjab, Rajasthan, UP, Uttarakhand and MP in terror-narcotics smugglers-gangsters nexus cases. pic.twitter.com/SG4QY0VOEo

    — ANI (@ANI) May 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कुठे आणि किती ठिकाणी टाकले एनआयएने छापे ?

  • दिल्ली-एनसीआर : 32 ठिकाणी एनआयएचे छापेमारी सुरूच आहे.
  • पंजाब-चंदीगड : 65 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
  • उत्तर प्रदेश : प्रतापगड, बरेली आणि लखीमपूर येथे छापे टाकण्यात आले आहेत.
  • राजस्थान : NIA ने 18 ठिकाणी छापे टाकले आहेत.
  • मध्य प्रदेश : NIA 2 ठिकाणी छापे टाकत आहे.
  • #WATCH | Visuals from Haryana's Bahadurgarh as NIA conducts searches at more than 100 locations across six states. The searches are underway in connection with terror-narcotics smugglers-gangsters nexus cases. pic.twitter.com/Z36i8oA8Kc

    — ANI (@ANI) May 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

  1. Tamil Nadu Hooch Tragedy : विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा झाला 21, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस
  2. Narendra Modi To Visit Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेसाठी जपान, ऑस्ट्रेलियासह जाणार चार देशांच्या दौऱ्यावर
  3. Junmoni Rabha Death : लेडी सिंघम जुनमोनी राभा यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय, आसामची सीआयडी करणार चौकशी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.