महाराष्ट्र

maharashtra

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेणार; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 5:32 PM IST

Updated : Oct 25, 2023, 10:08 PM IST

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनाला येणार आहेत. यावेळी ते मंदिरात भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या वेटिंग रुमचं उद्घाटन करतील.

PM Modi
PM Modi

नवी दिल्ली PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर देणार आहेत. यावेळी ते शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतील. पंतप्रधान कार्यालयानं ही माहिती दिली. याशिवाय पंतप्रधान मोदी गोव्यालाही भेट देणार आहेत. ते गोव्यात होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करतील.

७,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण : पीएमओनं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहण्यासाठी साईबाबा मंदिर परिसरात बनवलेल्या नवीन दर्शन रांग इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात मोदी सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण करतील. याशिवाय ते गोव्यातील मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ३७ व्या राष्ट्रीय खेळांचं उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते खेळांमध्ये सहभागी खेळाडूंना संबोधित करतील.

साई भक्तांसाठी नवी वेटिंग रुम : पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मोदी गुरुवारी दुपारी एक वाजता शिर्डी येथे पोहोचतील. तेथे ते साईबाबांच्या मंदिरात प्रार्थना करतील. याशिवाय मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या वेटिंग रुमचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या वेटिंग रुममध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांची बसण्याची क्षमता आहे. यामध्ये भाविकांना क्लोक रूम, टॉयलेट, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी सुविधाही मिळतील. या नव्या दर्शन क्यू कॉम्प्लेक्सची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आली होती.

86 लाख शेतकऱ्यांना दोन हजाराचा पहिला हप्ता एका क्लिकवर होणार वितरण -पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर येत आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे यावेळी. नमो किसान महासन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील 96 लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याचं वाटप मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर केलं जाणार आहे. कृषी विभागाकडून 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

गोव्यात राष्ट्रीय खेळांचं उद्घाटन करतील : शिर्डीत पंतप्रधान मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. येथे ते आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल यांसारख्या क्षेत्रातील सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यानंतर दुपारी २ वाजता मोदी निळवंडे धरणाचं जल पूजन करणार आहेत. मोदी संध्याकाळी ६.३० वाजता गोव्यात पोहोचतील, जिथे ते ३७ व्या राष्ट्रीय खेळांचं उद्घाटन करतील.

हेही वाचा :

  1. PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदींचा 26 ऑक्टोबरला शिर्डी दौरा, विविध कामांचं होणार लोकार्पण
Last Updated : Oct 25, 2023, 10:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details