ETV Bharat / state

PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदींचा 26 ऑक्टोबरला शिर्डी दौरा, विविध कामांचं होणार लोकार्पण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 2:05 PM IST

Updated : Oct 20, 2023, 10:19 PM IST

PM Narendra Modi Shirdi Visit : शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांच्या सुविधेसाठी उभारलेल्या 110 कोटी रुपयांचे नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्स आणि शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण येत्या 26 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Prime Minister Narendra Modi will visit Shirdi on October 26
पंतप्रधान मोदींचा 26 ऑक्टोबरला शिर्डी दौरा, विविध कामांच होणार लोकार्पण

साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर

अहमदनगर (शिर्डी) : PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्याला जाणार आहेत. यावेळी एसी दर्शन रांग, शैक्षणिक संकुल, निळवंडे प्रकल्प आदी कामांच लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे दुसऱ्यांदा शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत.

पहिला दौरा 2018 ला : 2018 साली साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी शिर्डीला आले होते. त्यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्स आणि शैक्षणिक संकुलाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा 26 ऑक्टोबरला साई संस्थानच्या वतीनं उभारण्यात आलेल्या 110 कोटी रुपयांची नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्स आणि शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शैक्षणिक संकुलाचंही करणार उद्घाटन : शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं सुमारे 110 कोटी खर्चात अद्यावत असा दर्शन रांग प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात अंतर्गद सुमारे दहा हजार भक्तांची वातानुकूलित अशा दहा हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसंच साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलाचंही उद्घाटन मोदी करणार आहेत. या नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्समध्ये एकाच वेळी 10 हजार भाविक बसू शकतात. मोठे वातानुकूलीत एसी हॉल, बायोमेट्रिक दर्शन पास, व्हीआयपी व्यवस्था, केटरिंग, कॅंटिंग सुविधा, टॉयलेट, बुक स्टॉल, लाडू प्रसाद हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे. शिर्डीच्या साईबाबांचे देश-विदेशात कोट्यवधी भक्त असून सुट्ट्या, सणांच्या दिवशी विक्रमी गर्दी होत असते. भाविकांना रस्त्यावर दर्शन रांगेत तासंतास ताटकळत उभं राहावं लागतं. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या त्रासातून भाविकांची आता येत्या 26 ऑक्टोबर पासून सुटका होणार आहे.

सहा महिन्यांपासून सुरु होते प्रयत्न : नरेंद्र मोदीच्या यांच्या शिर्डी दौऱ्यासाठी मागील सहा महिन्यांपासून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करत होते. अखेर यासाठी 26 ऑक्टोबरचा मुहूर्त साधण्यात आलायं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी साईबाबांचे निस्सी भक्त आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असायचे. पंतप्रधान मोदी हे 2018 साली साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर पुन्हा 26 ऑक्टोबर रोजी साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत.

हेही वाचा -

  1. PM Modi Inaugurate Namo Bharat Rail : देशातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत या रेल्वेची वैशिष्ट्ये?
  2. Israel Hamas Conflict : पियूष गोयल, हिमंता बिस्वा सरमा यांनी माफी मागावी; शरद पवार, सुप्रिया सुळेंबाबतच्या टीकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
  3. Pramod Mahajan Skill Development Centers : राज्यातील 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार उद्घाटन
Last Updated : Oct 20, 2023, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.