महाराष्ट्र

maharashtra

Opposition Meeting in Bengaluru : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या बैठकीला राहणार हजर

By

Published : Jul 18, 2023, 8:53 AM IST

विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी बंगळुरु येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज उपस्थित राहणार आहेत.

Opposition Meeting
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार

मुंबई :देशभरातील विरोधकांनी बंगळुरुत एकत्र येत भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे. या बैठकीत सोमवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उपस्थित राहिले नाहीत. मात्र आज शरद पवार हे विरोधकांच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. शरद पवार हे मुंबईतून बैठकीला रवाना झाले आहेत. आज विरोधकांनी आयोजित केलेल्या बैठकीत सहा मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

सोमवारी उपस्थित नसल्याने उलटसुलट चर्चा :राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोमवारी बंगळुरुत झालेल्या विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे देशभरात उलट सुलट चर्चा करण्यात येत होत्या. मात्र नियोजित कार्यक्रम असल्यामुळे शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असे राष्ट्रवादीच्या वतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांना कळवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती.

उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत सहभागी :विरोधी पक्षांनी बंगळुरु येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. देशभरातील 24 पक्षांचे 46 पेक्षा जास्त नेते या बैठकीला उपस्थित आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील या बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट :सोमवारी विरोधी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी बैठकीचे बंगळुरूत आयोजन केले होते. मात्र बैठकीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादीत झालेल्या अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सोमवारी अजित पवार यांच्यासह फुटलेल्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार यांनी विरोधी पक्षाच्या बैठकीत हजेरी लावली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा -

  1. Opposition Meeting in Bengaluru : विरोधी पक्षांच्या बैठकीत आज 'या' सहा महत्वाच्या मुद्द्यांवर होणार खल; भाजपविरोधात काय होणार एकमत?

ABOUT THE AUTHOR

...view details