ETV Bharat / bharat

Opposition Meeting in Bengaluru : विरोधी पक्षांच्या बैठकीत आज 'या' सहा महत्वाच्या मुद्द्यांवर होणार खल; भाजपविरोधात काय होणार एकमत?

author img

By

Published : Jul 18, 2023, 8:25 AM IST

बंगळुरू येथे विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज महत्त्वाच्या सहा मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत.

Opposition Meeting
संग्रहित छायाचित्र

बंगळुरू : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधकांनी 'मोट' बांधली आहे. आज विरोधकांची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत विरोधक सहा मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे. या बैठकीत 24 पक्षाचे 46 पेक्षा जास्त नेते सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे सोमवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. मात्र शरद पवार आज सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. दरम्यान बंगळुरूतील रोडवर नितीश कुमार यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत.

विरोधी पक्षाच्या 'या' नेत्यांनी लावली बैठकीत हजेरी : बंगळुरु येथे सुरू असलेल्या विरोधकांच्या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, डी राजा, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह 46 इतर पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. आजही हे नेते बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

  • Karnataka | Posters and banners targetting Bihar CM Nitish Kumar were put up at Bengaluru's Chalukya Circle, Windsor manor bridge and on the Airport road near Hebbal.

    Opposition leaders' meeting will be taking place today in Bengaluru. pic.twitter.com/QnDSaidhGM

    — ANI (@ANI) July 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महत्वाच्या सहा मुद्द्यांवर होणार चर्चा : आज सकाळी विरोधकांच्या बैठकीत महत्वाच्या सहा मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सकाळी 11 वाजता बैठकीचे प्रास्ताविक करणार आहेत. सकाळी 11.10 वाजतापासून या बैठकीत सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत दुपारी 2.30 वाजता उपसमित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. विरोधकांच्या या बैठकीत समितीच्या सचिवाची निवड होणार असून दुपारी तीन वाजता बैठक संपणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • #UPDATE | Karnataka | Police personnel remove banners from Bengaluru's Chalukya Circle. Posters and banners targetting Bihar CM Nitish Kumar were put up at several locations, including this spot, across Bengaluru ahead of the second day of the joint Opposition meeting. pic.twitter.com/GzIg4JdhRu

    — ANI (@ANI) July 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

समान किमान कार्यक्रम : विरोधकांनी भाजपला शह देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी चर्चा केली जाईल. या उपसमित्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाची महत्वाची भूमिका बजावणार आहेत. विरोधकांच्या घडामोडींबाबत एकमेकांशी संवाद साधण्यासाठी उपसमित्या काम करतील. किमान समान कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपसमिती स्थापन करण्यावर चर्चा होणार आहे. देशभरात भव्य मोर्चे काढण्याची आणि केंद्र सरकारच्या विरोधात जनआंदोलने कशी आयोजित करायची याची जबाबदारी ही समिती सांभाळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • #WATCH | Maharashtra | NCP chief Sharad Pawar leaves from his residence in Mumbai. He will participate in the joint Opposition meeting in Bengaluru, Karnataka today. pic.twitter.com/6dZL73rqam

    — ANI (@ANI) July 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • आघाडीमध्ये जागावाटपाबाबत गंभीर चर्चा होणार आहे. राज्यात जो पक्ष मजबूत असेल त्या पक्षाला अधिक जागा मिळाव्या.
  • आपापल्या राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा नेते देतील.
  • ईव्हीएमच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. चर्चेनंतर निवडणूक आयोगाला काही सूचना पाठवल्या जातील.
  • विरोधी आघाडीच्या नावावरही चर्चा होणार आहे.
  • बैठकीत सर्वांची सहमती असलेल्या नावावर चर्चा होईल.
  • आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी समन्वयक नेमण्यात येईल. या सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

आज दुपारी चार वाजता विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. आजच्या बैठकीतील ठरावांबाबत ते पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत.

कर्नाटकात सुरू झाले भाजपचे पतन : विरोधकांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर रणनीती ठरत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर टीका केली. कर्नाटकात भाजपचे पतन सुरू झाले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत यूपीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीनंतर सोमवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही प्रभावीपणे सामना केल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिथे प्रचार केला तिथे काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याचे सिद्धरामया यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -

  1. Opposition Meeting : विरोधकांच्या बैठकीला शरद पवारांची अनुपस्थिती, उद्या मात्र बेंगळुरूला जाणार
  2. NDA Meeting : यूपीए विरोधात काय आहे भाजपचा 'काउंटर प्लॅन'? विरोधकांच्या ऐक्याला असे देणार आव्हान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.