महाराष्ट्र

maharashtra

बाप्पाचं मुखदर्शन यंदाही नाही; नविन नियमावलीत ऑनलाईन माध्यमांद्वारेच दर्शनाला परवानगी

By

Published : Sep 8, 2021, 9:12 PM IST

Updated : Sep 8, 2021, 10:43 PM IST

लागबागचा राजा मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. शासनाने सुरुवातीला कोरोनाचे नियम पाळत मुख्य दर्शनाला परवानगी दिली होती. मात्र, राज्य सरकारने आज पुन्हा एक सुधारित पत्र काढले आहे. या पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, केवळ ऑनलाईन आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शन भाविकांना उपलब्ध करावे.

lalbagcha raja
लालबागचा राजा

मुंबई -येथे गणेशोत्सवाची धूम काही औरच असते. मात्र, कोरोनामुळे मागच्या वर्षी हा उत्सव काहीसा फिका फिका दिसून आला. गणेश उत्सव मंडपात कोणत्याही प्रकारची गर्दी नव्हती. मोठ्या मूर्ती नव्हत्या मूर्तीच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आली. मुंबईमध्ये सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडपामध्ये चार फुटाचा मूर्ती बसवण्यात आल्या होत्या. लालबागचा राजा येथे 2020 मध्ये गणपतीची मूर्ती बसवण्यात आली नव्हती. या ठिकाणी त्यांनी गतवर्षी आरोग्य उत्सव साजरा केला होता. मात्र, यंदा गणेश उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मूर्ती बसवण्यात येईल, असा निर्णय लालबागचा राजा या मंडळाने घेतला.

लालबागचा राजा मंडळाच्या माजी अध्यक्ष याबाबत याबाबत बोलताना

लालबागचा राजा मंडळाच्या माजी अध्यक्षांनी मांडली भूमिका -

लागबागचा राजा मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. शासनाने सुरुवातीला कोरोनाचे नियम पाळत मुख्य दर्शनाला परवानगी दिली होती. मात्र, राज्य सरकारने आज पुन्हा एक सुधारित पत्र काढले आहे. या पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, केवळ ऑनलाईन आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शन भाविकांना उपलब्ध करावे. कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावर लालबागचा राजा मंडळाचे माजी अध्यक्ष सुधीर साळवी यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्ही पूर्वीच्या नियमाप्रमाणेच तयारी केली होती. मात्र, आता नियम बदलले आहेत. त्यामुळे आम्ही मंडळाची बैठक घेऊ आणि आपली भूमिका जाहीर करू, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा -मुंबईत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा, महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करणार-आदित्य ठाकरे

Last Updated : Sep 8, 2021, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details