महाराष्ट्र

maharashtra

विधानसभा निवडणूक निकाल : काँग्रेस खूर्चीपेक्षा विचाराला महत्व देतं - नाना पटोले

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 8:18 PM IST

Assembly Election Results 2023 : देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल समोर आले असून तीन राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेला जनमताचा आदर करत जनतेचा कौल मान्य असून काँग्रेस खुर्चीपेक्षा विचाराला महत्व देत असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं.

Assembly Election Results 2023 Reaction
वर्षा गायकवाड आणि नाना पटोले

मुंबईAssembly Election Results 2023:चार राज्याच्या निवडणूक निकालावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रदेश कार्यलयात प्रतिक्रिया दिलीय. ज्या त्रुटी आणि चूका झाल्या असतील त्या सुधारल्या जातील. जनमताचा कौलाचा आदर करतो. दक्षिणेमध्ये भाजपाला दारे बंद झाले असते. हिंदू मुस्लिम मुद्द्यावर भाजपा राजकारण करत आहे. आज जरी आम्ही हरलो असलो तरी, जनता आम्हला सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही, लोकसभा आम्ही जिंकू असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.



भाजपाला पनौती लखलाभ:राज्यात अनेक प्रश्न आहे, राज्यात शेतकरी संकटात आहे आणि बेरोजगारी अशा ह्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देशासाठी जगतात, कोण कशासाठी जगतात हे मला सांगायची गरज नाही. महाराष्ट्राचा पदोपदी अपमान हे सरकार करत आहे. सध्याचे हे सरकार दिल्लीवर निर्भर आहे. पुष्कळ खेळ बाकी आहे, जनतेचा निर्णय मान्य असून आम्ही लोकशाहीला माननारी लोक आहोत.

लोकसभा आम्ही जिंकणार : पनौती कोण यावरून भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या टिकेला उत्तर देतांना पटोले म्हणाले की, मला पानौतीमध्ये जायचं नाही. पनौती हा शब्द काँग्रेसचा नसून तो जनतेचा आहे. पनौती शब्दाचा प्रचार करत असेल तर भाजपाला पनौती लखलाभ असो. ज्या मौदानाचे नाव सरदार वल्लभाई पटेल होतं ते बदललं. ते नाव लोकांनी दिलं होतं. महागाई कमी करायची भूमिका मांडली होती, लोकसभा निवडणुकीत दिसेल. लोकसभा आम्ही जिंकू. ईव्हीएम बद्दल मला बोलायचे नाही. तेलंगणाच्या विजयाच श्रेय राहुल गांधी घेत नसून त्यांनी तेथील जनता आणि कार्यकर्तेच श्रेय असल्याचं म्हटलं आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच काम सरकारच आहे. मात्र महाराष्ट्रात भाजपा आणि त्याच्यासोबत असलेल्या पक्षांना काहीच पडलेलं नसल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.



हार नहीं मानेंगे, फिर लडेंगे : निवडणुका म्हटल्यावर एकाचा पराभव आणि दुसऱ्याचा विजय, हे निश्चित आहे. पण मला सांगावंसं वाटतं की, महाराष्ट्रात जनतेचा आशीर्वाद आम्हालाच मिळावा, यासाठी आजपासूनच आम्ही नव्या जोमाने सुरुवात करत असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे. ज्या गोष्टीत आम्ही कमी पडलो, त्याचं आत्मचिंतन करू, येथील निकालचा महाराष्ट्र राज्याचा निकालावर परिणाम होणार नसल्याचेही गायकवाड यांनी सांगितलं.


हेही वाचा -

  1. भाजपाचा विजयोत्सव, चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचा जल्लोष; पाहा व्हिडिओ
  2. राजस्थानात वसुंधराच 'राजे'; पारंपरिक झालरापाटन मतदारसंघातून दणदणीत विजय
  3. तीन राज्यांत भाजपा विजयाच्या उंबरठ्यावर, काय म्हणाल्या खासदार हेमा मालिनी?

ABOUT THE AUTHOR

...view details