तीन राज्यांत भाजपा विजयाच्या उंबरठ्यावर, काय म्हणाल्या खासदार हेमा मालिनी?

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 1:50 PM IST

thumbnail

मुंबई BJP MP Hema Malini on Assembly Result : आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहrर होत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसची सत्ता येताना दिसत आहे. यावर बोलताना भाजपाच्या मथुराच्या खासदार तथा जेष्ठ अभीनेत्री हेमा मालिनी यांनी आनंद व्यक्त केलाय. तसंच ही खुप चांगली बातमी असल्याचं त्यांनी सांगितलंय. खासदार हेमा मालिनी आज मुंबईत आल्या होत्या. महानगर पालिका उद्यानातील दहा हजार झाडांचं वृक्षारोपन व इतर सुविधांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याठिकाणी हेमा मालिनी यांच्यासह भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाल शेट्टी तसंच अमृता फडणवीस या उपस्थित राहिल्या आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.