महाराष्ट्र

maharashtra

Mumbai University Election : सिनेट निवडणूक स्थगित; भाजपा आणि शिंदे गटाचा रडीचा डाव, विद्यार्थी संघटनांचा आरोप

By

Published : Aug 18, 2023, 2:24 PM IST

Updated : Aug 18, 2023, 3:46 PM IST

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आलीय. विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांनी निषेध व्यक्त केलाय. शिंदे-फडणवीस सरकारला आपला पराभव दिसत असल्याने त्यांनी निवडणुका स्थगित केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून केला जातोय.

सिनेट निवडणूक स्थगित
सिनेट निवडणूक स्थगित

सिनेट निवडणुकीवर प्रतिक्रिया

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक विद्यापीठाने स्थगित केलीय. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिदेषदेच्या बैठकीत हा निर्णय घेतण्यात आलाय. कोरोना महामारीमुळे येथील निवडणुका घेण्याचे थांबवण्यात आले होते. बऱ्याच दिवसानंतर निवडणुका होणार होत्या. विद्यार्थी संघटनांनी यासाठी तयारी केली होती. परंतु विद्यापीठाने रातोरात परिपत्रक काढत निवडणुका स्थगित केल्या.

रडीचा डाव : शासनाच्या या परिपत्रकावर दुसरीकडे विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतलाय. भाजपा आणि शिंदे सरकारचा हा रडीचा डाव असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे. निवडणुका रद्द केल्याने मनसे आणि ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरू केलाय. शासनाच्या या परिपत्रकावर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत हा रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया दिलीय. स्वतःच्या विद्यार्थी संघटनांची नामुष्की टाळण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट यांनी हा प्रकार केल्याचे छात्र भारती विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.

का निवडणूक स्थगित केली : मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीचे नियोजन वेळापत्रक विद्यापीठाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट होती. सर्व विद्यार्थी संघटना निवडणुकीची तयारी करत होत्या. परंतु अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच शासनाने निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार निवडणूक रद्द केल्याचे सांगितले. विद्यापीठाने निवडणूक स्थगित करण्याचे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही.

शिंदे गट आणि भाजपाला पराभव समोर दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट पराभवामुळे आधी खचले आहेत. म्हणून ही निवडणूक स्थगित करत आहेत. - युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत

निवडणूक स्थगित :मुंबई विद्यापीठामध्ये खूप काळानंतर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी यंदा 94 हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली होती. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या विशेष सभेत निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विद्यार्थी संघटनांनी निषेध व्यक्त केलाय.

भाजपा आणि शिंदे गट हे रडीचा डाव खेळत आहेत. त्याचे कारण बराच काळानंतर विद्यापीठांमध्ये सिनेटच्या निवडणुका जाहीर झाल्या.त्याचे वेळापत्रक देखील अधिकृतपणे प्रसिद्ध झाले. विद्यार्थी संघटना कामाला लागल्या. परंतु शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांना आपला पराभव दिसत आहे. त्यांच्या विद्यार्थी संघटना निवडून येऊ शकत नाहीत, म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. ते विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहेत. भाजपा आणि शिंदे गट यांच्या विद्यार्थी संघटनांची नामुष्की टाळण्यासाठीच हे केले. - छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र नेते रोहित ढाले

हेही वाचा-

  1. Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीची मोर्चेबांधणी; ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत रंगणार
  2. Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या निवडणुकीचा बिगुल वाजला; 10 सप्टेंबरला होणार मतदान
Last Updated :Aug 18, 2023, 3:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details