महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Crime News: गुन्हेगारांविरोधात मुंबईत ऑपरेशन ऑलआऊट, २१५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवत २३६ आरोपींची धरपकड

By

Published : Jun 26, 2023, 11:03 AM IST

Updated : Jun 26, 2023, 11:09 AM IST

मुंबईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शनिवारी रात्री पुन्हा एकदा शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबविले. रात्री ११ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलिसांनी शहरातील ५०७ संवेदनशील ठिकाणांची घातपात विरोधी पथकांकडून तपासणी केली.

Mumbai Crime News
मुंबई गुन्हे न्यूज

मुंबई :मुंबई पोलिसांनी २१५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले. यात पोलीस अभिलेखावरील ( रेकॉर्ड) ९५५ गुन्हेगारांची तपासणी करुन २३६ आरोपींची धरपकड करत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात शहरातील पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ऑपरेशन ऑल आऊटमध्ये सहभागी झाले. त्याचबरोबर विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, १३ परिमंडळाचे उपायुक्त, विशेष शाखा आणि सुरक्षा विभागाचे उपायुक्त, ३१ विभागीय सहायक आयुक्त, ९३ पोलीस ठाण्याचे वपोनि, पोलीस अधिकारी व अंमलदार या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये सहभागी झाले होते.

अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी २६ गुन्हे दाखल-पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि कोबिंग करुन अजामीनपात्र वॉरंट बजावलेल्या ७७ आरोपींसह पाच जणांवर स्थायी वाॅरंट बजावले. तसेच, अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी २६ गुन्हे दाखल करुन २८ आरोपींना पिस्तूल, चाकू, तलवारी अशा घातक शस्त्रांसह अटक केली आहे. शहरातून तडीपार करण्यात आलेल्या ४८ आरोपींवर मपोका कायद्याच्या कलम १४२ अन्वये तर, रात्रीच्या वेळी गुन्हा करण्यासाठी अस्तित्व लपवून फिरत असलेल्या ६९ आरोपींवर च्या कलम १२०, १२२आणि १३५ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे. सोबतच पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पोलीस रेकॉर्डवरी ३२३ आरोपी तपासले आहेत.


१ हजार ९९५ वाहन चालकांवर कारवाई-शहरात चालणाऱ्या दारु विक्री, जुगार अशा अवैध धंदे चालणाऱ्या ३४ ठिकाणी छापेमारी करून हे धंदे उध्वस्त केले आहेत. तसेच, पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अंमली पदार्थ कायद्यानव्ये ३९४ आरोपी तपासून २८ आरोपींविरोधात १९ गुन्हे दाखल करुन अटकेची कारवाई केली आहे. शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी शहरातील हॉटेल्स, लॉज, मुसाफिरखाने अशा ६०९ अस्थापनांची झडती घेतली आहे. पोलिसांनी शहरातील १०५ ठिकाणी नाकाबंदी करुन एकूण पाच हजार ९२७ वाहनांची तपासणी केली. यातील १ हजार ९९५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हेगारांवर वचक ठेवणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कॉम्बिंग ऑपरेशन राबविले जाते. अशा कारवाईदरम्यान अनेकदा मोठे गुन्हे उघडकीला येतात. तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई होते.


हेही वाचा-

  1. PFI Stickers : नवी मुंबईत आढळले पीएफआयचे स्टिकर्स अन् बॉम्ब; गुन्हा दाखल
  2. Mumbai Crime News : कुत्र्यांना खायला घालणे पडले महागात..महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला
Last Updated :Jun 26, 2023, 11:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details