ETV Bharat / state

Mumbai Crime News : कुत्र्यांना खायला घालणे पडले महागात..महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला

author img

By

Published : Jun 25, 2023, 3:44 PM IST

मुंबईत वस्तीत कुत्र्यांना खायला घालताना एका महिलेवर चाकू आणि ब्लेडने हल्ला करण्यात आला. आरोपींनी मुलीवर अपमानास्पद टिप्पण्या केल्या आणि कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून धमकावले. मुंबईतील चर्नी रोड परिसरात ही घटना घडली आहे.

MUMBAI WOMAN ATTACKED WITH KNIVES BLADES
मुंबईत महिलेवर चाकू ब्लेडने हल्ला

मुंबई : मुंबईतील चर्नी रोड येथे कुत्र्यांना खायला घालत असताना एका 22 वर्षीय महिलेवर पुरुषांच्या टोळक्याने चाकू आणि ब्लेडने हल्ला केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या त्या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या चर्नी रोडवरील सीपी टॅंक येथील सिक्का नगर परिसरात ही भीषण घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठले आहे.

महिलेला 46 पेक्षा अधिक टाके लागले : स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून, येथे एक महिला व तिचा भाऊ दोघे कुत्र्यांना खाऊ घालत होते. त्यावेळी काही मुले तेथे आली आणि त्यांनी त्यांना वारंवार शिवीगाळ करत त्रास देणे सुरु केले. आरोपींनी मुलीवर अपमानास्पद टिप्पण्या केल्या आणि कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून दोघांनाही धमकावले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान तिला 46 पेक्षा अधिक टाके लागले आहेत. या घटनेत तिचा 14 वर्षीय भाऊही जखमी झाला आहे.

बदल्याच्या भावनेतून हल्ला केल्याचा संशय : हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जस्ट स्माइल चॅरिटेबल ट्रस्टने घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली आणि तिला जेजे रुग्णालयात दाखल केले. एनजीओचे सदस्य दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्यासोबत एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी हल्लेखोर राजकुमार मिश्रा, रितिका मिश्रा आणि राजेश मिश्रा यांची ओळख पटवली आहे. हे सर्व महिलेचे शेजारी आहेत. योगायोगाने, हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी, तिच्या 14 वर्षांच्या भावावरही आरोपींनी हल्ला केला होता. या प्रकरणी व्हीपी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर हल्लेखोरांना इशारा देण्यात आला होता. बदलेच्या भावनेतून हा पूर्वनियोजित हल्ला केला गेला होता का, याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Rape On Girl In Mumbai : बाप-लेकीच्या नात्याला कलंक! पित्यानेच केला मुलीवर बलात्कार, नराधम बापासह शेजाऱ्यास अटक
  2. Mainpuri Murder : नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, खून केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडत आरोपीची आत्महत्या
  3. Nashik Crime News : मध्यरात्री रेल्वे स्थानकावर थांबणे पडले महागात; विवाहितेवर अत्याचार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.