महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona Update : मुंबईत एक्सबीबी, बीक्यू व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण

By

Published : Mar 26, 2023, 6:53 PM IST

कोरोनाच्या नवीननवीन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात वाढत आहेत. आता मुंबईत एक्सबीबी, बीक्यू व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांनी काळजी घेण्याची अधिक गरज आहे.

file photo
फाईल फोटो

मुंबई - मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्यावर ती कोणत्या कारणाने वाढत आहे. याचा शोध पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळोवेळी घेतला जात आहे. १४१ कोरोना रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात एक्स बीबी, बीक्यू, बीए, बी एन व्हेरिएंटचे व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका मुंबईकरांना अद्यापही असल्याचे समोर आले आहे.

जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या -मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाल्यानंतर २०२१ पासून पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांमधून नेमक्या कोणत्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत आहे, किती प्रमाणात प्रसार वाढला आहे हे समोर येत आहे. यामुळे कोणत्या उपाययोजना कराव्या, किती प्रमाणात रुग्णसंख्या वाढू शकते, कशा प्रकारची तयारी करावी याची माहिती मिळते असे आरोग्य विभागाने सांगितले.

कोणत्या व्हेरियंटचे किती रुग्ण -पालिकेने १ जानेवारी ते २५ मार्च २०२३ या कालावधीमधील १४१ नमुने पुण्याच्या एनआयव्ही या प्रयोगशाळेकडे पाठवले होते. याचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे. १४१ पैकी एक्सबीबीचे ७१ रुग्ण म्हणजे ५० टक्के, बीक्यूचे २३ रुग्ण म्हणजे १६ टक्के, सीएचएचचे ११ रुग्ण म्हणजे ८ टक्के, बीएचे १४ रुग्ण म्हणजे १० टक्के, बीएनचे ८ रुग्ण म्हणजे ६ टक्के, तर अन्य व्हेरियंटचे १४ रुग्ण म्हणजे १० टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

नागरिकांना आवाहन -मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. रस्त्यावर थुंकू नये, ताप सर्दी खोकला घशात खवखव यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ - राज्यासह मुंबईतही कोरोनाच्या नव्या विविध व्हेरियंट्या रुग्णांची वाढ होत आहे. एच3एन2 च्या रुग्णांमध्ये वाढ होतच आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई पालिकेने नागरिकांना केले असून, योग्य त्या उपाययोजना पालिकेकडून केल्या जात आहेत.

हेही वाचा -H3N2 Influenza Virus : एच३एन२ व्हायरस जुनाच, काळजी घेतल्यास त्याला रोखने शक्य - डॉ. गंजुन चचलानी

ABOUT THE AUTHOR

...view details