ETV Bharat / state

H3N2 Influenza Virus : एच३एन२ व्हायरस जुनाच, काळजी घेतल्यास त्याला रोखने शक्य - डॉ. गंजुन चचलानी

author img

By

Published : Mar 19, 2023, 7:49 PM IST

Updated : Mar 20, 2023, 7:31 PM IST

एच ३ एन २ या व्हायरस नवीन नसून जुना आहे. हात धुणे, मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करणे या उपाययोजनांमुळे विषाणूचा प्रसार रोखता येऊ शकतो, असे मत के. जे. सोमय्या रुग्णालयातील आयसीयू हेड डॉ. गुंजन चचलानी यांनी व्यक्त केले.

H3N2 Influenza Virus
H3N2 Influenza Virus

के जे सोमय्या रुग्णालयाच्या आयसीयू हेड डॉ. चचलानी माहिती देताना

मुंबई : देशभरात गेले तीन वर्षे कोरोना व्हायरसचा प्रसार होता. हा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असतानाच एच ३ एन २ या व्हायरसमुळे मृत्यू होऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये नव्या व्हायरसमुळे भीती निर्माण झाली आहे. मात्र, हा व्हायरस नवीन नसून जुना आहे. ताप सर्दी खोकला यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. हाय रिस्क नागरिकांनी तसेच इतरांनी कोविड काळातील नियमांचे म्हणजेच हात धुणे, मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आणि मृत्यूची संख्या रोखता येऊ शकते, अशी माहिती के जे सोमय्या रुग्णालयातील आयसीयू हेड डॉ. गुंजन चचलानी यांनी दिली.

त्याला व्हेरियंट असे का बोलतात? : १ जानेवारी ते १७ मार्च २०२३ पर्यंत एच १ एन १ चे ४०५ तर एच ३ एन २ चे १८४ रुग्ण आढळून आले आहेत. एच १ एन १ मुळे ३ मृत्यू झालेले आहेत. एच ३ एन २ मुळे १ मृत्यू झाला असून ३ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. डेथ ऑड कमिटीच्या हवालानंतर हे मृत्यू एच ३ एन २ चे आहेत का हे स्पष्ट होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, ज्या प्रमाणे ताप सर्दी खोकला होतो त्याच प्रमाणे लक्षणे असलेला एच ३ एन २ हा फ्लूचा एक व्हेरियंट आहे. एच १ एन १ हा व्हेरियंट जनावरांमध्ये विशेष करून डुकरांच्या माध्यमातून पसरत होता. आता तो माणसात पसरत असल्याने त्याला व्हेरियंट असे संबोधले जातो असे डॉ. चचलानी म्हणाल्या.

एच ३ एन २ व्हेरियंट हा २०११ पासून : डुकरांच्या माध्यमातून पसरणारा एच १ एन १ आणि सध्या पसरत असलेल्या एच ३ एन २ या दोन्ही व्हेरियंटमध्ये व्हॅकटेक्स एन जीन हा समान आहे. त्याचे जेनेटिक स्ट्रक्चरल मध्ये एक आहे. एच ३ एन २ व्हेरियंट हा २०११ पासून आहे. तेव्हापासून याचे रुग्ण नोंद होत आहेत. सध्या याचा प्रसार अधिक झाल्याने त्याची चर्चा सुरु झाली आहे. याआधी जे कामगार डुकरांसह, प्राण्यांसह तसेच शेतामध्ये काम करत होते त्यांना एच १ एन १ हा आजार होत होता. आता माणसातून माणसात या व्हेरियंटचा प्रसार होत आहे.

व्हायरस रक्तात पसरतो : एच ३ एन २ व्हेरियंटमध्ये सर्वाना होतो अशा तापासारखीच लक्षणे दिसून येतात. सर्दी खोकला ताप सारखे लक्षणे नव्या व्हायरस मध्येही दिसतात. एच ३ एन २ व्हेरियंटमध्ये व्हायरस रक्तात जास्त प्रमाणात पसरत असल्याने ताप मोठ्या प्रमाणात आल्याचे दिसून येते. १०२ ते १०३ पर्यंत ताप येणे, उलटी, जुलाब होणे, अंग दुखी अशी लक्षणे आढळून येत आहेत. याआधीच्या व्हेरियंटमध्ये तीन ते चार दिवस लक्षणे दिसायची आता एच ३ एन २ व्हेरियंटमध्ये पाच ते सात दिवस दिसत लक्षणे दिसतात.

या लोकांना धोका अधिक : ५ वर्ष खालील मुले, वयोवृद्ध, गरोदर महिला, हृदयाचे आजार, अस्थमा, हाय ब्लडप्रेशर, डायबेटिक्स, अवयव बदललेले रुग्ण यांच्यामध्ये एच ३ एन २ व्हेरियंट लवकर पसरू शकतो, त्यासाठी अशा लोकांची काळजी घेतली पाहिजे. गर्दीमध्ये अशा लोकांनी जाऊ नये. ज्यांना एच ३ एन २ व्हेरियंटची लागण झाली आहे अशा रुग्णांच्या जवळ हाय रिस्क लोकांनी जाऊ नये. हाय रिक्स पेशंटला या व्हेरियंटची लागण झाल्यास निमोनिया होऊ शकतो. त्यांना फ्ल्यू निमोनिया होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते आणि त्यात काहींचा मृत्यूही होऊ शकतो, असे डॉ. चचलानी यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी : समोर एकदा व्यक्ती कोणी खोकत असेल शिंकत असले तर त्यामधून दुसऱ्याला हा आजार होऊ शकतो. त्यामुळे आजारी असलेल्या लोकांनी गर्दीमध्ये जाऊन इतर लोकांमध्ये हा आजार पसरवू नये. हा व्हायरस हातामधून पसरतो त्यामुळे हात आपल्या चेहऱ्यावर लावू नयेत. हात किंवा बोटे डोळे, नाक आणि तोंडाला लावली जातात तेव्हा हा व्हायरस आपल्या शरीरात पसरतो. कोविड प्रमाणे हात सतत स्वच्छ धुवा, हात डोळे नाक आणि तोंडाला सतत लागणार नाही याची काळजी घ्या. हाय रिक्स किंवा ज्यांना गर्दीच्या ठिकाणी गरजेचे आहे त्यांनी मास्क जरूर वापरावे त्यामुळे हा आजार रोखता येऊ शकतो, असे डॉ. चचलानी यांनी सांगितले.

या करा उपाययोजना : एच ३ एन २ व्हेरियंटची लागण आपल्याकडे यावर औषधे आहेत, अँटी व्हायरल ड्रग्स उपलब्ध आहेत. ती या आजारात वापरता येऊ शकतात. नागरिकांना ताप आला असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे आणि औषधोपचार करून घ्यावे. जेणे करून रुग्णालयात भरती करणे, आयसीयूमध्ये भरती करणे, व्हेंटिलेटर लावणे मृत्यू होते हे आपण रोखू शकतो. नागरिकांनी या आजारावर अँटी बॅक्टेरीयला औषधें घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अँटी व्हायरल औषधे घ्यावीत. सध्या एच ३ एन २ व्हेरियंटवर व्हॅक्सिन तयार होत आहे. ती शेवटच्या टप्प्यात आहे. ती व्हॅक्सिन हाय रिस्क नागरिकांनी जरूर घ्यावी. तसेच आपल्याकडे फ्लू वरील व्हॅक्सिन आहे ती घेऊन आपण रुग्णांची संख्या कमी करू शकतो. ती व्हॅक्सिन हाय रिक्स नागरिक दरवर्षी घेऊ शकतात असे डॉ. चचलानी म्हणाल्या.


हेही वाचा : H3N2 Influenza Virus : राज्यात एच ३ एन २ चे १८ नवे रुग्ण, ३ संशयित मृत्यूंची नोंद

Last Updated : Mar 20, 2023, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.