महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढला ७३९ नव्या रुग्णांची नोंद

By

Published : Jun 1, 2022, 7:50 PM IST

मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आटोक्यात आली. मात्र अलीकडे कोरोनाचा प्रसार ( Corona Spread ) वाढताना दिसत आहे. मंगळवारी ५०६ रुग्णांची नोंद झाली होती तर आज बुधवारी ७३९ नव्या रुग्णांची नोंद ( increases to 739 new cases) झाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंता वाढत आहे.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

मुंबई: मुंबईत बुधवारी कोरोनाचे ७३९ नवे रुग्ण नोंदवल्या गेले आहेत ( Mumbai Corona Update ). तर २९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६६ हजार ५४१ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १० लाख ४४ हजार ००५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९७० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २०२७ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३३ टक्के इतका आहे. नवे ९६ टक्के रुग्णांना कोणतेही लक्षण नाही.

मुंबईत पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंद झाली होती. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली आहे. ५ मे ला १३०, १३ मे ला १५५, १९ मे ला २२३, २४ मे ला २१८, २६ मे ला ३५०, २९ मे ला ३७५, ३० मे ला ३१८, ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा :Corona In Mumbai : मुंबईत कोरोना वाढतोय; चाचण्या वाढवा, पालिका आयुक्तांचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details