महाराष्ट्र

maharashtra

Rohini Khadse : राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; रोहिणी ख़डसेंकडं सोपवली 'ही' जबाबदारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 10:31 PM IST

राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. (NCP Woman Wing President) (Rohini Khadse) (Rohini Khadse NCP Woman Wing President)

Rohini Khadse
रोहिणी खडसे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे- भाजपासोबत घरोबा केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा वारंवार केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे संघटनात्मक फेरबदल सध्या पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण या विराजमान होत्या. शरद पवार यांच्या हस्ते रोहिणी खडसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. (NCP Woman Wing President) (Rohini Khadse) (Rohini Khadse NCP Woman Wing President)

रोहिणी खडसे राष्ट्रवादीत सक्रीय -एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रोहिणी खडसे यांनी 2019 च्या विधानसभेची निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपामध्ये त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत पक्षाचं काम सुरू केलं. आता त्यांच्यावर पक्षानं नवीन जबाबदारी दिली आहे.

महिलांचं संघटन अधिक मजबूत करणार - या नियुक्तीबद्दल बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, वडिलांमुळं सुरुवातीपासूनच मी राजकारणात सक्रिय आहे.वडिलांचा मतदारसंघ बांधण्याचं काम केलं. त्यामुळे आता राज्यातही संघटन वाढीसाठी राज्यभर दौरे करणे आणि महिलांचं संघटन अधिक मजबूत करणं ही माझी प्राथमिकता राहणार आहे.

पक्षात फेरबदल - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट लक्षात घेता पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवार गटानं सर्वस्व पणाला लावलं आहे. त्यासाठी आता मुंबईसह राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यासाठी पक्षाची धावपळ सुरू झाली आहे. त्याचेच पडसाद मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत दिसून आले. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत प्रतिज्ञापत्र लवकरात लवकर भरण्याची सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांकडून देण्यात आली.

प्रतिज्ञापत्रासंदर्भात सविस्तर चर्चा -राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि निरीक्षक यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत या प्रतिज्ञापत्रासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशावर आणि तत्त्वांवर बिनशर्त निष्ठा ठेवतो. तर जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून यांच्या नेतृत्त्वाला मनापासून, बिनशर्त आणि अटळ पाठिंबा असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar On Modi : कोल्हापुरात शरद पवारांचा धोबीपछाड, मुश्रीफांसह बच्चु कडूंना लोळवलं, मोदींनाही सुनावले खडेबोल
  2. Bawankule Reaction : अंतर्मनातून शरद पवार कधीच मोदींवर टीका करू शकत नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे
  3. Sharad Pawar Attack On Modi : केंद्रातील सरकार विश्वासपात्र नाही, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details