महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Rain Update : पुढचे पाच दिवस पावसाची सुट्टी, कोकणाला मात्र यलो अलर्ट

By

Published : Jul 28, 2023, 10:19 PM IST

राज्यात मागील काही दिवस पावसाने (Maharashtra Rain Update) जोरदार बॅटिंग केली होती. त्यानंतर आता पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (Maharashtra Weather Update) पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकण आणि मुंबईसाठी शनिवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

MUMBAI RAIN
रेन फाईल फोटो

मुंबई - हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टनंतर (Maharashtra Rain Update) शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली आहे. आता हवामान विभागाने पुढचे 5 दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच कोकणपट्टा वगळता उर्वरित महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवली आहे. तर, कोकण विभागाला मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पावसाची विश्रांती - हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही भागात अद्यापही पावसाचे ढग आहेत. काही भागांना पुढच्या 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, उद्या जो काही पाऊस कोसळेल त्यानंतर पुढचे काही दिवस वातावरण शांत असणार आहे. पुढच्या काही दिवसांत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात पाऊस होईल. तर, कोकण आणि विदर्भाला यलो अलर्ट आहे. अतिवृष्टीची शक्यता कोणत्याही भागात होणार नाही. त्यामुळे पुढचे पाच दिवस कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

मुंबईला यलो अलर्ट - मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नागपूरसह अनेक शहरांमध्ये गुरुवार-शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईत शनिवारीही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 जूनपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत महिनाभरात मुंबईत 2000 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात 21 जुलैपर्यंत प्रथमच 1,000 मिमी आणि त्यानंतर पाच दिवसांत 1,000 मिमी पावसाची नोंद झाली.

चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती - मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, इराई आणि वर्धा नद्याही ओसंडून वाहत आहेत. तसेच काही ठिकाणी पुराचे पाणी शहरात घुसले आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी चंद्रपूर जिल्हास्तरावर बचावकार्य सुरू आहे. पुराच्या पाण्याने बाधित झालेल्यांना शाळांमध्ये स्थलांतरीत होण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. विस्थापित नागरिकांसाठी 12 महापालिका शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आतापर्यंत 312 लोकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने विस्थापितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्यात पुराचे थैमान; जिल्हास्तरावर बचावकार्य सुरू
  2. Hingoli Monsoon : वसमत तालुक्यात मुसळधार पावसाने तलावाची फुटली भिंत; अनेकांच्या घरात शिरले पाणी
  3. Kolhapur Flood: पूर पाहायला गेलेला तरुण नदीच्या पुरात रात्रभर अडकला, बचाव पथकाने 'अशी' केली सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details