महाराष्ट्र

maharashtra

BMC Dead Body Bag Scam : कथित बॉडी बॅग घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांची ईडीकडून आज होणार चौकशी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 9:15 AM IST

Updated : Nov 8, 2023, 10:35 AM IST

BMC Dead Body Bag Scam : कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना 6 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावलं. यानुसार आज किशोरी पेडणेकर यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर
माजी महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई BMC Dead Body Bag Scam : मुंबई महापालिकेनं कोवीड काळात खरेदी केलेल्या डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणी ईडी अ‍ॅक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. ईडीनं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय. या कथित घोटाळ्याची रक्कम 49.63 लाख इतकी असून याप्रकरणी ईडीकडून आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईच्या महापौर आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.



अटकेची टांगती तलवार काही काळ दूर : कोरोना महामारीच्या काळात 2020 मध्ये झालेल्या डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणात बेकादेशीर आर्थिक व्यवहार झाला. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांसह इतर चार व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप ठेवत गुन्हा नोंदवला गेला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबईच्या माजी महापौरांविरोधात गुन्हा नोंदवला. त्यामुळं किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. असे असले तरी 20 डिसेंबरपर्यंत पोलिसांनी अटक न करण्याचे आदेश न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांनी 6 नोव्हेंबर 2023 रोजी दिले आहेत.




नेमकं प्रकरण काय : तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड यांना व्हीआयपीएलकडून 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला. 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये करण्यात आलाय. या संदर्भात पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होईल; असं न्यायमूर्तींनी निश्चित केलंय.

हेही वाचा :

  1. BMC Dead Body Bag Scam : किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, महापालिका अतिरिक्त आयुक्तांची आज होणार चौकशी
  2. Body Bag Scam Case: बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात महापौर किशोरी पेडणेकर यांची पुन्हा शुक्रवारी होणार चौकशी
  3. Body Bag Scam Case : कोविड बॉडी बॅग प्रकरण; किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या, ED कडून गुन्हा दाखल
Last Updated :Nov 8, 2023, 10:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details