महाराष्ट्र

maharashtra

JP Nadda Mumbai visit : जेपी नड्डा यांनी लालबागच्या राजाला ११ नारळाचे तोरण केले अर्पण, 'असा' राहिला मुंबईचा दौरा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 6:28 PM IST

मागच्याच आठवड्यात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब येऊन गेल्यानंतर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गणपती दर्शनाच्या निमित्ताने जे. पी. नड्डा आज मुंबई आणि पुणे दौऱ्यावर आले आहेत.

JP Nadda Mumbai visit
JP Nadda Mumbai visit

मुंबई- मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब मुंबईत लालबागच्या राजासहित इतर गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे मुंबई व पुणे दौऱ्यावर असून मुंबईत पोहचल्यावर त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाला जे पी नड्डा यांनी ११ नारळाचे तोरण अर्पण केले.

मुंबईसहित महाराष्ट्रात सध्या गणपतीची बाप्पाची धूमधाम सुरू आहे. विशेष करून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठे नेते, अभिनेते त्याचबरोबर सामान्य भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रविण दरेकर आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रावर ओढवलेली सगळी संकटे दूर करावीत, अशी लालबागच्या राजाच्या चरणी नड्डा यांनी प्रार्थना केली.

जेपी नड्डा यांची गणेशमंडळांना भेट



मुंबईचे सर्वात जुने गणपती बाप्पा-लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर जे. पी. नड्डा यांनी मुंबईतील गिरगाव येथील सर्वात जुने गणपती अर्थात केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव मंडळाला भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या सुख व समृद्धीसाठी त्यांनी गणरायाकडं प्रार्थना केली. केशवजी चाळ परिसरामध्ये जे. पी. नड्डा यांचे गिरगावकरांनी मोठ्या जल्लोषात लेझीम खेळत स्वागत केले. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येथे एक छोटेखानी रोड शोसुद्धा आयोजित करण्यात आला होता. या भव्य स्वागतासाठी तसेच स्नेह आणि उत्साहासाठी नड्डा यांनी गिरगावकरांचे आभार मानले आहेत.



वर्षा आणि सागर बंगल्यावर घेतले बाप्पाचे दर्शन-लालबागच्या राजाचे व केशवजी नाईक चाळीतील गणपतीच्या दर्शनानंतर जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचेही दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांसोबत जे. पी. नड्डा यांची काही काळ चर्चाही झाली.



आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट-नड्डा यांनी यानंतर वांद्रे पश्चिम येथील भाजपाचे मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे मागच्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत आल्यानंतर सर्वात अगोदर सपत्नीक आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट दिली होती. नड्डा यांनी मुंबई सोडण्यापूर्वी आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. त्यानंतर ते पुण्यासाठी रवाना झाले.

हेही वाचा-

  1. Ganesh Festival 2023: लालबागच्या राजासमोर कोळी महिलांनी केलं नृत्य सादर, पहा व्हिडिओ
  2. Letter To Lalbaugcha Raja : 'बाप्पा, माझं चुकलं. मला माझी नोकरी परत मिळू दे..', भाविकानं लालबागच्या राजाला पत्र लिहून केला गुन्हा कबूल

ABOUT THE AUTHOR

...view details