महाराष्ट्र

maharashtra

International Yoga Day 2023: विधान भवनात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

By

Published : Jun 21, 2023, 11:35 AM IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पहिल्यांदाच मुंबईतील विधानभवनाच्या प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, त्याचबरोबर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित होते. तणावमुक्त जीवनासाठी योग अतिशय महत्त्वाचे साधन असल्याचे सांगत, अशाच पद्धतीचा योग सर्वांनीच केला तर विधिमंडळाचे कामकाज सुरळीत चालेल, अशा पद्धतीचा टोला देवेंद्र फडवणीस यांनी लगावला आहे.

International Yoga Day 2023
विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मुंबई :आज जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना मुंबईत सुद्धा विधान भवनाच्या प्रांगणात योग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने येथे योगो प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाचा आनंद घेत, फक्त एक दिवस नाही तर दररोज अशा पद्धतीचा योग अभ्यास करायला हवा, असे मत व्यक्त केले. प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. पंतप्रधान मोदींनी ९ वर्षापूर्वी योग दिनाला सुरुवात केली ती आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आजचा दिवस शाश्वत व निरंतर दिवस ध्यानात ठेवावा असा दिवस आहे. आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी हा दिवस आहे. आपल्या मनाच्या संतुलनासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे.

करो योग रहो निरोग- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

योग चळवळ निर्माण : आजच्या दिवसाला खऱ्या अर्थाने संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिली, म्हणून आपली योग साधना आदरणीय मोदी साहेबांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली हे सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. म्हणून योग चळवळ निर्माण चालू झाली आहे. आज सर्वत्र योग केला जातो ही मोठी उपलब्धी आहे. तणाव कमी करण्यासाठी योग फार महत्वाचा आहे. आपण आज अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुले, महिला, माता असे एकूण ३५ लाख सदस्य एकाच वेळी संपूर्ण राज्यात योगाभ्यास करत आहोत. त्यामुळे योग घराघरात पोहोचवणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.




फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा : या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सर्वांना आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये एक प्रस्ताव ठेवला. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा, यासाठी जगातील सर्व देशांनी त्याला पाठिंबा दिला. जगामध्ये २०० पेक्षा जास्त देशांमध्ये योग दिवस साजरा केला जातो. अनेक देशात लोक योग करताना पाहायला भेटतात. स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये जवळजवळ १५० देशांसोबत योगाभ्यास करताना पाहायला भेटणार आहेत.

विधिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी अशा पद्धतीचा दररोज योगाभ्यास केला तर विधिमंडळाचे कामकाज सुरळीत चालेल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैज्ञानिक पद्धतीने योगशास्त्र : योग प्रगती आहे. निरोगी राहण्याकरता अतिशय वैज्ञानिक पद्धतीने योगशास्त्र हे तयार करण्यात आले आहे. विशेषता रोग होऊ नये, याकरता आपण प्रिव्हेंटिव्ह अशा प्रकारचा विचार करतो. त्याकरता योग्य शास्त्र सर्वात प्रभावी अशा प्रकारचा प्रभाव आहे. म्हणून आज जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण तान तणावाचा सामना करत असतो, अशावेळी सर्वात प्रभावी उपाय म्हणून योगासने आहेत. म्हणून आज या योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना आरोग्य लाभावे ,अशी अपेक्षा करतो. सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देत असताना टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

हेही वाचा :

  1. International Yoga Day 2023: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केला मुंबईत योगा दिवस साजरा, पियूष गोयल यांच्यासह राज्यपालांनी घेतला सहभाग
  2. International yoga day 2023 : योगदिनानिमित्त देशभरात उत्साह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी योगदिनात घेतला सहभाग
  3. International Yoga Day 2023: पंतप्रधान मोदींकडून भारतीय नौदलाच्या 'ओशन रिंग ऑफ योग'चे कौतुक, काय आहे ही रिंग?

ABOUT THE AUTHOR

...view details