महाराष्ट्र

maharashtra

SRA Scam Case : एसआरए घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By

Published : Mar 31, 2023, 6:39 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चार आठवड्याचा दिलासा दिला आहे. त्यांच्यावर मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

SRA Scam Case
SRA Scam Case

मुंबई :शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पेडणेकर यांनी एसआरए फ्लॅट प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सुनावणी 30 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. पेडणेकर यांच्याविरुद्ध ३० मार्चपर्यंत आरोपपत्र दाखल करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांचा दिलासा दिला आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील जमिनीसंदर्भात खरेदी-विक्रीचे अनेक स्तर ठेवण्यात आले होते. या जमिनीत गैरवापर झाला होता. यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप करत किरीट सोमय्या केला होता. या संदर्भात सोमय्या यांनी मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर किशोरी पेडणेकर यांना संबंधित अधिकाऱ्याने नोटीसही बजावली होती.

एफआयआर रद्द करण्याची मागणी :या प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. तसेच त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप, तसेच दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. याचिकेत त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.

पेडणेकरांना चार आठवड्यांचा दिलासा : मुंबई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याला आव्हान देत किशोरी पेडणेकर यांनी आपल्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र दाखल करू नये, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. त्यांच्या मागणी अर्जावर गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले होते. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. या संदर्भात न्यायालयाने किशोरी पेडणेकर चार आठवड्यांचा दिलासा देत एप्रिलमध्ये सुनावणी घेण्याचे ठरवले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घोटाळा :भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एसआरए प्रकल्पात काही फ्लॅट्स आणि दुकाने एकमेकांच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात चौकशी सुरू होती.

हेही वाचा - Security Devotees Clash in Shirdi : साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि भाविक एकमेकांना भिडले

ABOUT THE AUTHOR

...view details