महाराष्ट्र

maharashtra

Bollywood Actress Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सत्र न्यायालयाचा दिलासा; सार्वजनिक ठिकणी चुंबनप्रकरणी याचिका फेटाळली

By

Published : Apr 3, 2023, 10:43 PM IST

राजस्थानमध्ये एका चित्रपटाच्या प्रोमो वेळी सार्वजनिक ठिकाणी रिचर्ड गेरे या हॉलीवूड अभिनेत्याने शिल्पा शेट्टी हिचे चुंबन घेतल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्याबाबत मुंबईच्या दंडाधिकारी यांनी शिल्पा शेट्टी हिला दिलासा दिला आहे. मात्र, दिलासा देणाऱ्या त्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र शासनाने सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने दंडाधिकार्‍यांचा आदेश कायम ठेवला, त्यामुळे शिल्पा शेट्टीला दिलासा मिळाला आहे.

Bollywood Actress Shilpa Shetty
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सत्र न्यायालयाचा दिलासा

मुंबई :राजस्थानमध्ये एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेला हॉलिडे अभिनेता रिचर्ड गेरे आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी सार्वजनिकरित्या जनतेसमोर एकमेकांचे चुंबन घेतले होते, असा आरोप केला गेला होता. त्यामुळे राजस्थान येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ती तक्रार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली होती. त्यानंतर या प्रकरणात शिल्पा शेट्टीला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिच्याविरोधातील याचिका फेटाळली आहे. राजस्थानमध्ये ए़ड्स जागरूकता कार्यक्रमात दोघांकडून चुंबन घेतले गेल्याने, सर्व स्तरातून यावर टीका झाली होती.


या गुन्ह्याअंतर्गत होणार होती कारवाई :दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 292 आणि 293 व 294 अश्लीलता तसेच माहिती तंत्रज्ञान आणि महिलांचे अशोभनीय वर्तणूक कायद्याच्या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दाखल झालेल्या गुन्ह्यांना शिल्पा शेट्टीने सर्वोच्च न्यायालयामध्ये 2017 एक अर्ज केला. त्यात तिने हे खटले मुंबईमध्ये हस्तांतरित करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार हे गुन्हे हस्तांतर केले गेले आणि या प्रकरणाची सुनावणी बेलार्ड पियर मुंबई येथील महानगर दंडाधिकारी यांच्याकडे झाली.


नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या विरुद्ध आदेश : तत्कालीन महानगर दंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी जानेवारी 2022 मध्ये शिल्पा शेट्टीची सुटका केली. त्यावेळी त्यांनी आदेशात असे म्हटले होते की, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याची ती बळी ठरली. मात्र, या महानगर दंडाधिकारी यांच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य शासनाने सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. त्यामध्ये असा दावा केला गेला होता की, दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना सोडण्यात एक प्रकारे चूक केलेली आहे. हा आदेश बेकायदेशीर आहे तसेच यामध्ये नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या विरुद्ध आदेश दिला गेलेला आहे. त्यामुळे महानगर दंडाधिकारी यांनी शिल्पा शेट्टी ही हॉलिवूड अभिनेता रिचर्ड याची बळी ठरली. या आदेशाला राज्य शासनाने दिलेले आव्हान सत्र न्यायालयाने फेटाळून लावले. त्यामुळे शिल्पा शेट्टीला अंतरिम दिलाचा मिळाला आहे.

हेही वाचा : Nawazuddin-Aaliya Settlement : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया यांचा कौटुंबिक कलह संपण्याच्या मार्गावर; दोघांमध्ये 'समझोता'

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details