महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole On Opposition Party: पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस निभावणार - नाना पटोले

By

Published : Jul 17, 2023, 5:05 PM IST

Updated : Jul 17, 2023, 6:16 PM IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शंख फुकला आहे. राज्यात विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस पक्ष निभावणार आहे. पायऱ्यांवरील आंदोलनात राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या गैरहजेरीवरून नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Patole On Opposition Party
नाना पटोले

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रतिक्रिया देताना नाना पटोले

मुंबई :पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव आणला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बोलू दिले नाही. कडक कायदा करू म्हणत फक्त वेळ मारून नेण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. आज विरोधी पक्षांनी भाजपप्रणित शिंदे सरकारला घेरले. भाजप प्रणित तिघाडी सरकारला जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी कोणतेही देणेघेणे नसून शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचे नाव येताच आम्ही या पदासाठी दावा करणार असल्याची माहिती देखील नाना पटोले यांनी दिली आहे.


विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम :सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलू दिले जात नाही. जनतेचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगताय. बोगस बियाण्यांमुळे कापसाचे पीक आले नाही, पिके आणि वर्षही वाया गेले. गत वर्षाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून राज्यातील तिघाडे सरकार शेतकरी विरोधी असल्याचाही आरोप पटोले यांनी केला. जनतेला आणि शेतकऱ्याला लुटण्याचे काम सरकार करत आहे.


कॅसिनोला काँग्रेसचा विरोध :भाजपने महाराष्ट्रातील संस्कृतीला कलंक लावण्याचे पाप केले आहे. राज्यात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता सत्ताधारी गोवा राज्याच्या धरतीवर कॅसिनो सुरू करण्याचे पाप करणार आहेत. यापूर्वी किराणा दुकानात बियर विकण्याची परवानगी दिली आहे. आधीच मुंबई परिसरात डान्सबार सुरू असून त्यात अशा गोष्टी सुरू करून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप राज्यातील सरकार करत आहे. राज्यात कॅसिनो सुरू करण्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

  1. Maharashtra Monsoon Session : नव्या संदर्भात नीलम गोऱ्हेंच्या उपसभापतीपदावर विरोधकांचा आक्षेप, विरोधकांचा सभात्याग
  2. Balasaheb Thorat On Opposition Leader: विरोधी पक्षनेते पदी कुणाची निवड होणार? बाळासाहेब थोरातांनी दिले स्पष्ट उत्तर
  3. Shiv Sena Party Symbol News : उद्धव ठाकरेंच्या हाती मशाल राहणार की जाणार? सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाच्या याचिकेवर आज सुनावणी
Last Updated : Jul 17, 2023, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details