ETV Bharat / state

Balasaheb Thorat On Opposition Leader: विरोधी पक्षनेते पदी कुणाची निवड होणार? बाळासाहेब थोरातांनी दिले स्पष्ट उत्तर

author img

By

Published : Jul 17, 2023, 1:25 PM IST

Updated : Jul 17, 2023, 2:07 PM IST

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरुवात झाले आहे. जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांचे सभागृहात नेतृत्व करणारा विरोधी पक्ष नेता हा एकाच वेळी आक्रमक, संयमी आणि अभ्यासू असणे गरजेचे असते. सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणारे अनेक दिग्गज विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभेने पाहिले आहेत. पण यंदाचे पावसाळी अधिवेशन सुरु होईपर्यंत विरोधी पक्षनेता कोण? हाच पेच सुटला नव्हता. अर्थसंपकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेतापदाची धुरा सांभाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता अजित पवार पक्षातल्या आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. विधानसभेतला पुढचा विरोधी पक्ष नेता ठरलेला नाही. मात्र हा तिढा सुटेल आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या नावाचा फैसला होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Balasaheb Thorat On Opposition Leader
बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याची गरज असते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पटलावर तुलनेने कमी कामकाज असेल. पण विरोधी पक्षनेत्याची निवड आजच होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेतापदावर काँग्रेसचाच आमदार असेल, अशी ग्वाही देत नेता निवडीबाबत आपण दिल्लीतून मार्गदर्शन घेत आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

विरोधी पक्ष नेता पदासाठी दावेदारी : कॉंग्रेस पक्षातील बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या जेष्ठ नेत्यांची नावे विरोधी पक्षनेता पदासाठी चर्चेत आहे. पण दुसऱ्या फळीतील तडफदार नेत्याला काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये विधानसभेतील आमदारांची संख्या 45 आहे. आम्हीच विरोधी पक्ष नेते पदासाठी दावेदार असून दिल्लीत याबाबत योग्य निर्णय येईल, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितले आहे.


राज्यात लुटलूट सुरू : सत्ताधारी पक्षाकडून विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधक कुमकुवत असल्याचे म्हटले गेले. मात्र प्रत्यक्षात तसे काही नाही. सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम बघितला असेल तर समजेल की, सगळेच सदस्य एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत होते. आपला आपला वाटा कसा मिळेल, हा प्रश्न उपस्थित नेत्यांच्या मनात आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना लागवला आहे. सध्या राज्यात लुटालूट सुरू असल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला.




शरद पवार विरोधकांच्या बैठकीला अनुपस्थित? : बंगळुरू येथे आज केंद्रातील भाजपा विरोधातील विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांनी या बैठकीला आज अचानक जाणे रद्द केले. याबाबत आपल्याकडे काही माहिती नाही. पण कदाचित शरद पवार बैठकीच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहतील, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान भाजपाविरोधात एकवटलेल्या देशभरातल्या विरोधी पक्षांतील नेत्यांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मंगळवार, 18 जुलै रोजी जाणार असल्याची माहिती अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.



हेही वाचा :

  1. Maharashtra Assembly 2023 Update : विरोधकांमध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष-नाना पटोले
  2. Maharashtra Monsoon Session 2023 : शरद पवार गटातील नेत्यांना अजित दादांसोबत बसायाचं नाही; जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
  3. Maharashtra Monsoon Session 2023: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता, 'या' मुद्द्यांसह महत्त्वाच्या विधेयकांवर होणार चर्चा
Last Updated : Jul 17, 2023, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.