ETV Bharat / state

Maharashtra Monsoon Session 2023 : शरद पवार गटाच्या आमदारांना अजित पवारांजवळ जागा नको.. जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

author img

By

Published : Jul 17, 2023, 7:29 AM IST

Updated : Jul 17, 2023, 1:00 PM IST

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात मोठी ट्विस्ट निर्माण झाला आहे. दरम्यान अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही बाजूला दिसणार आहे. शरद पवार गट विरोधी बाकावर असेल तर अजित दादा गट हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूला असणार आहेत. दरम्यान अजित पवार गटाच्या बाकाजवळ शरद पवार गटाला बसायचे नाही. यासाठी राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्र विधानसभा

मुंबई : आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अजित पवार यांनी आपल्या आमदारांसह बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाल्याचे चित्र सर्व राज्याने पाहिले. त्यामुळे अधिवेशनात राष्ट्रवादीचे एक गट सत्ताधारी व विरोधकांच्या बाकावर असताना राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

आव्हाडांचे अध्यक्षांना पत्र : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार कॅम्प) मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिलेले आहे. या पत्रात आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी अजित पवार कॅम्पमधील सदस्य आणि पक्षाच्या उर्वरित आमदारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. रविवारी सभापती राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात आव्हाड म्हणाले की, सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार यांच्यासह 9 आमदार वगळता राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे. शपथ घेतलेले 9 आमदार वगळता इतरांची बसण्याची व्यवस्था स्वतंत्रपणे करावी, अशी विनंती आव्हाड यांनी केली आहे.

अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोण नेते सत्तेत आहेत आणि कोण विरोधी पक्षात आहे याचे चित्र स्पष्ट नाही. खरे पाहिले तर राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व कोणी करायचे हे कसे ठरवायचे यावर बरीच चर्चा आणि वाद होतील.- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

कोणाकडे नेमके आमदार किती : गेल्या वर्षीही अशाच प्रकारची बंडखोरी शिवसेनेत झाली होती. त्यावरुन बोलताना नार्वेकर म्हणाले, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शिवसेनेविषयीचा निर्णय दिला आहे, त्यामुळे शिवसेनेचा प्रश्न माझ्यासाठी सुटला आहे. दरम्यान राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. परंतु माझ्याकडे त्यांच्या कार्यालयाकडून कोणतेही अपडेट नाही. दरम्यान, शिंदे- फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांसह 9 आमदार सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी विधीमंडळातील 288 आमदारापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार होते. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पहिल्या बैठकीत राष्ट्रवादीचे 35 आमदार आणि आठपैकी 5 आमदारांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र, अजित पवारांच्या गटात नेमके किती आमदार त्यांच्या पाठीशी आहेत, याची माहिती नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Vasant More On Ajit Pawar : मनसे नेते वसंत मोरेंनी केले उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत 'मोठे' विधान
  2. MLA Support Ajit Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी 'या' आमदाराचा पाठिंबा
Last Updated :Jul 17, 2023, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.