महाराष्ट्र

maharashtra

SSC Result 2023: दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नने मारली बाजी; लातूर विभाग राज्यात सातवा क्रमांकावर

By

Published : Jun 2, 2023, 10:28 PM IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील ९४.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात लातूर विभागाचा एकूण निकाल ९२.१६ टक्के इतका लागला आहे. या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

SSC Result 2023
लातूर विभागाचा एकूण निकाल

माहिती देताना मारुती फडके

लातूर:आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी लातूर विभागाचे विभागीय सहसचिव मारुती फडके यांनी सांगितले की, लातूर विभागीय शिक्षण मंडळात लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो. लातूर विभागात लातूर जिल्हा निकालामध्ये अव्वल ठरला आहे. यावर्षी लातूर विभागातून एकूण १ लाख ५ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले. प्रत्यक्षात १ लाख ४ हजार ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात मुलांनी ८९.९९ टक्के तर मुलींची ९४.७१ टक्के यश संपादन केले. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. सन, २०२२ क्या निकालापेक्षा यंदा ४.६ टक्के निकाल कमी लागला आहे.



उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या: यंदाच्या दहावीच्या निकालात लातूर विभाग राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. विभागात एकून १ लाख ४ हजार ५८२ मुले तर १ लाख २ हजार ८८२ मुलींनी परीक्षा दिली. यामध्ये मुलांपेक्षा ४.३८ टक्के मुलींची परीक्षा उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. लातूर विभागीय मंडळातील नांदेड जिल्हा ९०.३९ टक्के, धाराशिव ९३.५० तर लातूर ९४.८८ टक्के निकाल लागला असून लातूर विभागात लातूर जिल्हा निकालात प्रथम क्रमांकावर आहे.

आज दहावीचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील ९४.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.निकालात लातूर विभागाचा एकूण निकाल ९२.१६ टक्के इतका लागला आहे. लातूरचा निकाल ९४.८८ टक्के लागला असून, लातूर विभागात लातूर जिल्हा निकालात प्रथम क्रमांकावर आहे. -सहसचिव मारुती फडके

विभागांमध्ये कॉपीयुक्त अभियान: यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेतील रनरला 'जीपीएस' प्रणालीचा वापर करण्यात आला होता. शिवाय निर्धारित वेळेपेक्षा विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसमोर 'शिक्षासूची'चे वाचन करण्यात आले होते. शिवाय कॉपीयुक्त अभियान विभागांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आले होते. त्यामुळे विभागात एकूण केवळ 24 गैरप्रकरने घडली. लातूर विभागातील १८०९ शाळांपैकी ३८३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असल्याचे, लातूरच्या विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव मारुती फडके यांनी सांगितले आहे.

मुलींचा निकाल हा 95.87 टक्के: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 95.87 टक्के लागला. विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा 98.11 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा 92.05 टक्के लागला आहे.

हेही वाचा -

  1. SSC Result 2023 59 वर्षाच्या आज्जी झाल्या दहावी उत्तीर्ण तब्बल 40 वर्षानंतर घेतले पुस्तके हातात
  2. Maharashtra SSC Result 2023 दहावीचा निकाल 9383 टक्के पुन्हा मुलींनीच मारली बाजी

ABOUT THE AUTHOR

...view details