महाराष्ट्र

maharashtra

मित्रानेच काढला मित्राचा काटा, तिसऱ्या दिवशी 'त्या' खुनाचा उलघडा

By

Published : Jul 11, 2020, 2:56 AM IST

मंगळवारी गॅस एजन्सीमध्ये डिलीव्हरी बॉयचा काम करणाऱ्या प्रभाकर सोळुंके याचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी याचा तापस करत त्याची हत्या करणाऱ्या त्याच्या मित्राला तिसऱ्याच दिवशी ताब्यात घेतले.

मृत प्रभाकर सोळुंके
मृत प्रभाकर सोळुंके

लातूर - चाकूर शहरालगतच लातूर-नांदेड महामार्गावर एका दुकानासमोर 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि. 7 जुलै) सकाळी निदर्शनास आला होता. तीक्ष्ण हत्याऱ्याने लातूर शहरातील गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा खून झाला होता. त्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी (दि. 10 जुलै) पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. मित्रानेच मित्राचा काटा काढला असल्याचे समोर आले आहे.

प्रभाकर गोविंद सोळुंके (वय 28 वर्षे) हा लातूर शहरातील एका गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करीत होता. मंगळवारी सकाळी चाकूर शहरालगत त्याचा मृतदेह आढळून आला होता. तीक्ष्ण हत्याऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर वार केले होते. मोबाईल कॉल डिटेल्सवरुन या खुनाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले.

शुक्रवारी (दि. 10 जुलै) सकाळी अहमदपूर तालुक्यातील लांजी येथून धनराज सुधाकर आगलावे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय गुन्ह्यात वारलेली दुचाकीही जप्त पोलिसांनी जप्त केली आहे.

लातूर येथून प्रभाकर सोळुंके व त्याचे मित्र चाकूरकडे निघाले होते. दरम्यान, दारुच्या नशेत त्यांच्यात भांडण झाले. यात प्रभाकरच्या डोक्यात दगड घालत स्क्रू ड्रायवरने त्याच्या अंगावर वार करण्यात आले होते. सुधाकर आगलावे सोबत त्याचा मित्र लक्ष्मण गायकवाडही होता. सुधाकरने या गुन्ह्याची कबुली देण्यात आली आहे.

घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. भालेराव, पोलीस कर्मचारी राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, सचिन धारेकर, नागनाथ जांभळे यांनी घटनेचा छडा लावत संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -डिजिटल शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार : आमदार संभाजी पाटील निलंगेकर

ABOUT THE AUTHOR

...view details