महाराष्ट्र

maharashtra

आता आमचा योग्य पद्धतीनं सुखाचा संसार सुरू झाला: शंभूराज देसाई असं का म्हणाले?

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 9:38 PM IST

Shambhuraj Desai Reaction : लोकसभेला 45 जागा (Loksabha Election) आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या (Maharashtra Election) 200 जागा आम्ही जिंकू, असा दावा उत्पादन शूल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

Shambhuraj Desai
शंभूराज देसाई

प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई

कोल्हापूर Shambhuraj Desai Reaction: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो. मात्र साताराच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे एकत्र बसून निर्णय घेतील. आता आमचा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य पद्धतीने सुखाचा संसार सुरू झाला आहे. 2024 ला लोकसभेतल्या 45 जागा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या 200 जागा आम्ही जिंकू असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय.


अधिवेशनात आरक्षण संदर्भात सकारात्मक चर्चा होणार : मंत्री शंभूराजे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सहपरिवार श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं (Karveer Nivasini Shree Ambabai) आणि दख्खनचा राजा ज्योतिबाचे दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी हिवाळी अधिवेशन येत्या सात तारखेपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षणांवर सकारात्मक चर्चा करणार येणार आहे. सध्या समाजामध्ये काही समज गैरसमज निर्माण झाले आहेत. कोणाचा तरी आरक्षण काढून कोणाला तरी दिलं जाईल. मात्र ही भूमिका राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाही. कोणाचाही काढून न घेता कायदेशीर दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल या संदर्भात सरकार प्रयत्न करत आहे.



जरांगे पाटलांनी संयम बाळगावा: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणांसाठी आंदोलन पेटलं आहे. यासंदर्भात मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारने अटक करण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज काय आहे हे दाखवून देऊ असा इशारा दिला होता. मात्र आंदोलनात दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले झाले तर वेगवेगळ्या नियमानुसार कारवाई होत असते. दोन्ही समाजाने सलोखा आणि संयम बाळगावा. या आधी लाखोच्या संख्येने मराठा मोर्चा निघाले, मात्र एक टाचणी देखील खाली पडली नाही. इतक्या शांततेत आंदोलन होत होती. मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास आहे हे त्यांनी स्वतः सांगितलं आहे. यामुळं जरांगे पाटलांनी संयम बाळगावा अशी विनंती शंभूराज देसाई यांनी केली आहे. तसेच आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं असून या हल्ल्याबाबत अद्याप मला कोणतीही माहिती नाही. मात्र मागणी करत असताना सनदशीर मार्गानेच करावी कोणीही कायदा हातात घेऊ नये असेही देसाई यावेळी म्हणाले आहेत.



जो शब्द प्रयोग केला आहे तशी अवस्था त्यांची 2024 ला होईल : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी 2024 ला महायुतीचा विदूषक होणार आहे असा हास्यास्पद आरोप महायुतीवर केला होता. याला शंभूराजे देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून 2024 च्या निवडणुकीत वडेट्टीवार यांनी त्यांचा पक्ष कितव्या नंबरला असणार आहे याचा त् विचार करावा. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तुमचा पक्ष कितव्या नंबरला गेला आहे. याची त्यांनी आकडेवारी काढून पहावी. त्यांच्याकडे सध्या विरोधी पक्षनेते पद आहे, त्यामुळं ते असे बोलत आहेत. मात्र त्यांनी आम्हाला जो शब्द प्रयोग केला आहे, तशी अवस्था त्यांची 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर होईल, असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. ठाकरे आणि राऊत यांच्या वक्तव्यांची चौकशी करणार - मंत्री शंभूराज देसाई
  2. Shambhuraj Desai on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ समाजात निर्माण करताहेत संभ्रम - शंभूराज देसाई
  3. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापराल तर आम्हीही जशास तसे बोलू - मंत्री शंभूराज देसाई

ABOUT THE AUTHOR

...view details