ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापराल तर आम्हीही जशास तसे बोलू - मंत्री शंभूराज देसाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 6:33 PM IST

Shambhuraj Desai On Uddhav Thackeray : राज्यात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगाणात जाऊन प्रचार करत आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Shambhuraj Desai On uddhav thackeray
मंत्री शंभूराज देसाई आणि उद्धव ठाकरे

मुंबई Shambhuraj Desai On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी अपशब्द वापरला आहे. जर अशा पद्धतीने ते अपशब्द वापरणार असतील तर आम्हालाही जसास तसं तीव्रतेनं बोलावं लागेल असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. तसंच त्यांच्या असंसदीय शब्दाबाबत कारवाई करणं शक्य आहे का? याबाबत आम्ही पोलीस आणि कायदेतज्ञांशी चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. देसाई आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील एकाही शेतकऱ्याला नुकसानीच्या मदतीपासून वंचित ठेवणार नाही. अवकाळी पावसाची तालुका निहाय आकडेवारी गोळा करण्याचं काम सुरू असल्याचंही देसाई यांनी सांगितलं.



शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सवड नाही : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात बोलताना, राज्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकरी त्रस्त असताना मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला परराज्यात जात आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सवड नाही, अशा शब्दात टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाबद्दल विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले की, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेजारील राज्याने प्रचारासाठी आदराने बोलावलं असेल आणि आम्ही महायुतीतला घटक पक्ष असल्यानं प्रचारासाठी जाणं चुकीचं नाही. मुख्यमंत्री केवळ एका दिवसासाठी तेलंगाणामध्ये गेले आहेत, ते पुन्हा रात्री महाराष्ट्रात परतणार आहेत.

आपलं ठेवायचं झाकून आणि... : मुख्यमंत्री हे सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. दरम्यानच्या काळात राज्यातील तीन मंत्री सध्या फिल्डवर असून ते शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी लगेच जायला पाहिजे अशी परिस्थिती नाही. कारण जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, तेव्हा कोकणात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्यावेळेस ते केव्हा पोहोचले होते? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केलाय. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी त्यांना सवय लागली आहे, असंही यावेळी देसाई यांनी म्हटलं.



एका दिवसात किती जिल्हे पाहणार : विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी एका दिवसामध्ये या भागाचा दौरा करण्याचं जाहीर केलं आहे. एका दिवसात हे कुठे-कुठे जाणार आहेत? कसला दौरा करणार आहेत? असा सवाल देसाई यांनी विचारला.

हेही वाचा -

  1. Desai On Sanjay Raut : "राऊतांना त्यांचेच खबरी एक दिवस अडचणीत आणतील"; - शंभूराज देसाई
  2. Shambhuraj Desai on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ समाजात निर्माण करताहेत संभ्रम - शंभूराज देसाई
  3. Shambhuraj Desai : विधानभवनातील पुडीची चर्चा सर्वत्र, मंत्री देसाई म्हणाले, मी गोगावलेंना 'ही' पुडी दिली; तर आदित्य ठाकरे म्हणाले....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.