महाराष्ट्र

maharashtra

Kolhapur News : कौतुकास्पद! आठवीतील विद्यार्थ्याने बनविले 'क्लँपिंग स्विच' उपकरण, दाखवून दिली बुद्धिमत्तेची उंची

By

Published : Sep 20, 2022, 6:52 PM IST

Updated : Sep 20, 2022, 7:39 PM IST

Prasad Jadhav

हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव गावातल्या पाराशर हायस्कूल ( Parashar High School ) मधील एका आठवीत शिकणारा मुलगा चर्चेत आला आहे. त्याने बनविलेल्या एका प्रोजेक्ट मुळे तो चर्चेत आला आहे. वय वर्षे 13 मात्र उंची केवळ 2 फूट असल्याने त्याला काही अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावरच उपाय म्हणून त्याने एक प्रोजेक्ट बनवला ( Clamping Switch Device ) आणि बघता बघता संपूर्ण कोल्हापूरात चर्चेत आला आहे. कोण आहे हा मुलगा ज्याची चर्चा सुरू आहे. पाहुयात या विशेष रिपार्ट मधून.( Prasads Height Is 2 feet But A Clamping Switch Device Is Made )

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव गावातल्या पाराशर हायस्कूलमधील ( Parashar High School ) एका आठवीत शिकणारा मुलगा चर्चेत आला आहे. त्याने बनविलेल्या एका प्रोजेक्टमुळे तो चर्चेत आला आहे. वय वर्षे 13 मात्र उंची केवळ 2 फूट असल्याने त्याला काही अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावरच उपाय म्हणून त्याने एक प्रोजेक्ट बनवला ( Clamping Switch Device ) आणि बघता बघता संपूर्ण कोल्हापूरात चर्चेत आला आहे. कोण आहे हा मुलगा ज्याची चर्चा सुरू आहे. ( Prasads Height Is 2 feet But A Clamping Switch Device Is Made)




विज्ञान प्रदर्शनात विषेश गरजा गटात बनवले 'हे' उपकरण :हातकणंगले तालुक्यातल्या बाळासाहेब पाटील हायस्कूल ( Balasaheb Patil High School ) या ठिकाणी 49 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवे पारगांव येथील पाराशर हायस्कूल मधील विशेष गरजा लहान गटातून इयत्ता आठवीतील विद्यार्थी प्रसाद संजय जाधव ( Prasad Jadhav ) या विद्यार्थ्याने सुद्धा सहभाग नोंदवला होता. यामध्ये त्याने 'क्लँपिंग स्विच' ( Clamping Switch Device ) हे उपकरण बनवले आणि या उपकरणाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. प्रसादने आपल्या दिव्यांगावर मात करून हे उपकरण बनवले आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आठवीतील प्रसादची उंची 2 फूट, परंतू बनवले 'क्लँपिंग स्विच' उपकरण

प्रसादचा प्रोजेक्ट ठरला कुतुहूलचा विषय-प्रसाद हा तेरा वर्षाचा असून त्याची उंची दोन फूट नऊ इंच आहे. तर वजन नऊ किलो आहे. त्याला सायकल चालवणे, विज्ञान उपकरण तयार करणे, चित्र काढणे, भाषणे करणे, विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेणे इत्यादी खूपच आवड आहे. त्यातच आता कमी उंची असणाऱ्या या प्रसादने बनविलेल्या एका प्रोजेक्टमुळे तो पारगाव परिसरात कुतुहालाचा ठरला आहे. दरम्यान, यासाठी त्याला पाराशरचे प्राचार्य एस. वाय. काटे, पर्यवेक्षक यांचे प्रोत्साहन लाभले तर विज्ञान विभागाच्या प्रमुख स्वाती कोकीतकर व इतर विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Last Updated :Sep 20, 2022, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details