महाराष्ट्र

maharashtra

महिलांनी साडी चोळीनं भरली ओटी, कोल्हापुरात थाटात पार पडलं गायीचं डोहाळे जेवण

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 12:33 PM IST

Cow Dohale Jevan : वर्षभरापूर्वी गाईच्या मूळ मालकांनी गाभण राहत नाही म्हणून सोडून दिलेल्या गायीला कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील प्राणी प्रेमींनी आसारा दिला. कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईचे प्राण वाचवून तिचा सांभाळ केला. दरम्यान, जयसिंगपूरच्या शाहूनगर समडोळे मळा येथील व्ही बॉईज चौक मंडळानं नुकतंच या गाईचं डोहाळे जेवण मोठ्या दिमाखात साजरं केलं.

dohale jevan celebration of cow in kolhapur
कोल्हापुरात पार पडलं गाईचं डोहाळे जेवण

कोल्हापुरात पार पडलं गाईचं डोहाळे जेवण

कोल्हापूर Cow Dohale Jevan :'मातृत्व' हा महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचं कोड कौतुक करतात. मात्र, कोल्हापुरात काही मित्रांनी मिळून चक्क गायीचं डोहाळ जेवण करीत, गायीच्या मातृत्वाचा उत्सव साजरा केलाय. त्यामुळं या डोहाळ जेवणाची सर्वत्र चर्चा होतीय.

वन्य प्राण्यांना दिलं जातं जीवनदान : प्राणिमात्रांच्या हक्कासाठी धावून येणारे तसे मोजकेच असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील काही मित्रांनी एकत्र येत प्राणी प्रेम जोपासलंय. भटक्या गाई, जखमी झालेली कुत्री, यांच्यावर उपचार करून तसंच कोणत्याही वन्य प्राण्यांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्याचं काम हे तरुण गेली अनेक वर्ष करत आहेत. दरम्यान, मागीलवर्षी या तरुणांनी कत्तलखान्यात घेऊन जात असलेल्या काही गाईंची सुटका केली. त्यापैकीच एक गाय सांभाळण्याचा या मंडळानं सामुदायिक निर्णय घेतला. तसंच त्यांनी या गाईचं नाव 'राधा' असं ठेवलं.

डोहाळे जेवणाच्या पत्रिकाही छापल्या :काही दिवसांनंतर ही गाय गाभण राहिली. त्यानंतर आपल्या लाडक्या राधा गाईला सात महिने पूर्ण झाल्यानंतर तिचं डोहाळे जेवण करण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात करण्याचं नियोजन मंडळाकडून करण्यात आलं. त्यानुसार जयसिंगपूरच्या शाहूनगर समडोळे मळा येथील व्ही बॉईज चौक मंडळाच्या तरुणांनी गाईच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या पत्रिका छापल्या. तसंच एखाद्या लग्नाप्रमाणे त्यांनी या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी केली.


आकर्षक सजावट, दीड हजार माणसांचे जेवण :या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी मंडळानं चौकात मंडप लावला. तसंच गायीला फुलांच्या माळांनी सजवून वाजत-गाजत याठिकाणी आणण्यात आलं. मग सुवासिनी महिलांनी गायीला साडी, फळं देऊन ओटी भरली. त्यानंतर सुमारे 1500 हून अधिक नागरिकांना यावेळी गोडधोडाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.

हेही वाचा -

  1. Cow Funny Video : शॉपिंग मॉलमध्ये घुसली गाय, स्टाइल पाहून लोकं झाले थक्क, पाहा VIDEO
  2. Maa Goshala cow sale scam : गोरक्षच निघाले गोतस्कर, 13 लाख 65 हजार रुपयांचे 285 गोवंश खोटे दस्तऐवज दाखवून अवैधरित्या विकले
  3. Indias First Cloned Gir Calf : दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गीर जातीच्या गायीचे यशस्वी क्लोनिंग

ABOUT THE AUTHOR

...view details