ETV Bharat / state

Maa Goshala cow sale scam : गोरक्षच निघाले गोतस्कर, 13 लाख 65 हजार रुपयांचे 285 गोवंश खोटे दस्तऐवज दाखवून अवैधरित्या विकले

author img

By

Published : Nov 5, 2022, 7:41 PM IST

भंडारा जिल्ह्यात गौरक्षकच भक्षस (Gorakshak turned into Gotaskar) निघाल्याची घटना पुढे आली आहे. साकोली तालुक्याच्या बाम्हणी गावातील माँ गोशाळा (Maa Goshala cow sale scam) येथील अध्यक्षांनी त्यांच्या 12 संस्थाचालकाच्या मदतीने तब्बल 285 जनावरांचे मृत्यूचे खोटे पंचनामे करून परस्पर विल्हेवाट (Disposal of animal deaths making false panchnamas) लावली. त्यांच्यावर लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Maa Goshala cow sale scam
माँ गौशाळा

भंडारा : जिल्ह्यात गौरक्षकच भक्षस (Gorakshak turned into Gotaskar) निघाल्याची घटना पुढे आली आहे. साकोली तालुक्याच्या बाम्हणी गावातील माँ गोशाळा (Maa Goshala cow sale scam) येथील अध्यक्षांनी त्यांच्या 12 संस्थाचालकाच्या मदतीने तब्बल 285 जनावरांचे मृत्यूचे खोटे पंचनामे करून परस्पर विल्हेवाट (Disposal of animal deaths making false panchnamas) लावली. त्यांच्यावर लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जनावरांच्या विक्रीनंतर रिकामा झालेला गोठा


कत्तलखानाकडे जाणाऱ्या जनावरांना दिले होते रक्षणासाठी - गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 1/8/20 ला सालेकसा जंगल शिवारात 285 गोवंश दाटीवाटीने एकमेकांना रस्सीने बांधून कत्तल करण्यासाठी कोंबून ठेवले होते. याप्रकरणी आरोपी वीरेंद्र मोहबे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी आमगाव यांनी साकोली तालुक्यातील बाम्हनी येथिल माँ गौशाळा यांना जोपर्यंत या गुन्ह्याचा निपटारा होत नाही तोपर्यंत या जनावरांचा ताबा देण्याचे आदेश दिला. या आदेशानुसार या जनावरांची देखरेख करणे, त्यांना योग्य प्रकारे चारा देणे, औषध उपचार करणे, त्यापैकी कुठलाही जनावर कत्तलखाण्याकडे जाणार नाही याची काळजी घेण्याचे काम माँ गौशाळेला करायचे होते.


एका वकिलामुळे प्रकरण आले बाहेर - एका वकिलाने पोलीस अधीक्षक यांना मेलद्वारे माँ गोशाळा येथे जनावरांची अवैधरीत्या परस्पर विक्री केल्याची माहिती दिली. भंडारा पोलीस अधीक्षक यांनी लगेच साकोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक धनराज सेलोकर यांना चौकशीचे आदेश दिले. ज्या 285 जनावरांना या गौशाळेत देखरेखी साठी ठेवण्यात आले होते चौकशी दरम्यान यापैकी एकही जनावर या गौशाळेत उपलब्ध नव्हते. यावर उत्तर देताना संस्थेचे अध्यक्ष दुधराम पुलीराम उईके यांनी 285 पैकी 175 जनावर मरण पावले. यापैकी बारा जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत शवविच्छेदन केले तर 163 जनावरांचा शवविच्छेदन न करता करता संस्थेच्या सदस्यांनी स्थळ पंचनामे केले आहेत. उर्वरित 110 जनावरांपैकी 83 जनावरे बाम्हनी, मुंडीपार, खैरी येथील शेतकऱ्यांना हमी पत्रावर पालन पोषण करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. तर 27 जनावरे निर्मळ गौशाळा पिंपळगाव सडक येथे जमा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल- मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत 159 जनावरे मृत दाखवून खोटे स्थळ पंचनामे तयार करून त्यावर साक्षीदारांच्या खोट्या सह्या घेतल्या. तसेच जी जनावरे हमीपत्रावर शेतकऱ्यांना दिली असल्याचे सांगितले. त्या हमीपत्रांवर सुद्धा खोट्या साक्षरा केल्या असून गोशाळा चालविणाऱ्या या तेरा ही सदस्यांनी मिळून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता खोटे पंचनामे आणि खोटे हमीपत्र तयार करून एकूण 13, 65,000 हजार रुपयांची गोवंश जनावरे माननीय न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता किंवा त्यांना न कळविता परस्पर विक्री करून विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. संस्थेचे अध्यक्ष दूधराम उईके, रामेश्वर निंबार्ते, चंद्रशेखर मेनपाले, दादाराम लुटे, राजेश राऊत, रमेश उईके, मुकेश मेनपाले, भास्कर बांते, उद्धव रहपाडे, सुखदेव बावणे, गजीराम मेश्राम, कोमल कटारे आणि प्रमोद भुते सर्व राहणार ब्राह्मणी या तेराही लोकांविरुद्ध पोलीस स्टेशन लाखनी येथे 406, 420, 467, 468, 471, 34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.