महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापूर : ओबीसी आरक्षणासाठी भाजपाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By

Published : Sep 16, 2021, 8:37 AM IST

Updated : Sep 16, 2021, 9:37 AM IST

kolhapur

सत्तेतील काही नेते समाजाच्या हिताच्या निर्णयाकडे बघण्यापेक्षा ते भ्रष्टाचार आणि अनैतिक कामात अग्रेसर आहेत. जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत भाजपा रस्त्यावरची लढाई सुरू ठेवेल, असा इशारा भाजपाने दिला.

कोल्हापूर -महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यापासून अपयशी ठरले. सत्तेतील काही नेते समाजाच्या हिताच्या निर्णयाकडे बघण्यापेक्षा ते भ्रष्टाचार आणि अनैतिक कामात अग्रेसर आहेत. जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत भाजपा रस्त्यावरची लढाई सुरू ठेवेल, असा इशारा भाजपाने दिला. तसेच या विरोधात आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली.

प्रतिक्रिया

'प्रश्न मार्गी लागेपर्यंत भाजपा रस्त्यावरच राहील' -

ओबीसींच्या आरक्षणासाठी आज भाजपाच्यावतीने राज्यभर निदर्शने करण्यात आली. कोल्हापुरातदेखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्यावतीने जोरदार निदर्शने केली. महाविकास आघाडी विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच ओबीसीचे आरक्षण रद्द झाले, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केला. सरकारमधील मंत्र्यामध्ये विकास कामांसाठी समन्वय नाही. मात्र, भ्रष्टाचार आणि अनेक कामांसाठी समन्वय असल्याची खोचक टीका यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केली. ओबीसींना आरक्षण न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज कोल्हापुरात देण्यात आला. ओबीसी आरक्षणासंदर्भाता महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने घेत नाही. तोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हा पातळीवर मोर्चा, निदर्शने, आंदोलने केली जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला. जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यापेक्षा हे मंत्री सर्व अनैतिक कामात पुढे आहेत. पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र, ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत भाजपा रस्त्यावरच राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळांची माहिती

Last Updated :Sep 16, 2021, 9:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details