महाराष्ट्र

maharashtra

जालन्यात जुगार अड्ड्यावर छापा, दिड लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Jun 29, 2020, 3:41 AM IST

गोपीकिशन लोहगाव गोगडे यांच्या वाड्यात बंद खोलीत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहरातील जुन्या जालन्यातील शनि मंदिर चौक परिसरात हा वाडा आहे. यानंतर सुधीर खिरडकर पथकासह, कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांनी रात्री छापा टाकला.

kadim jalna police station
कदीम जालना पोलीस ठाणे

जालना - शहरातील शनी मंदिर परिसरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या पथकाने कदीम पोलीसांसह केली.

शाम रामभाऊ गोगडे (वय - 28, रा. गवळी मोहल्ला), नागेश सदाशिव कुसुंदर (वय - 38), गोपीकिशन गोगडे (वय - 32, दोन्ही रा. शनि मंदिर चौक), संजय धोंडीबा गायकवाड (वय - 48, रा. सत्कार कॉम्प्लेक्स) अकबर रहीम सय्यद (वय - 59, नूतन वसाहत), संजय डुकरे (वय - 39, जुना जालना), लालू बबन लाड (रा. गवळी मोहल्ला) अशी आरोपींची नावे आहेत.

गोपीकिशन लोहगाव गोगडे यांच्या वाड्यात बंद खोलीत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहरातील जुन्या जालन्यातील शनि मंदिर चौक परिसरात हा वाडा आहे. यानंतर सुधीर खिरडकर पथकासह, कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांनी रात्री छापा टाकला.

हेही वाचा -कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट; केवळ पीपीई कीटचे आकारले 27 हजार रुपये बिल

यावेळी काही जण हे झन्ना मन्ना नावाचा खेळ खेळत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी नगदी रक्कम, मोबाईल, वाहन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण सुमारे एक लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर या 7 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी कैलास जावळे, सोमनाथ लहानगे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details