ETV Bharat / city

कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट; केवळ पीपीई कीटचे आकारले 27 हजार रुपये बिल

author img

By

Published : Jun 28, 2020, 8:19 PM IST

Updated : Jun 28, 2020, 8:36 PM IST

कल्याण पूर्वेत राहणारे रविंद्र राजभर हे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असलेल्या मेट्रो स्टार मल्टीस्पेशलीस्ट हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर रवींद्र यांना त्या खासगी रुग्णालयातील मॅनेजमेंटने उपचाराचे बिल त्याच्या हाती दिले. तेव्हा त्या बिलात तीन दिवसात पीपीई कीटचे 27 हजार रुपये आकारल्याचे नमूद केले.

metro star multispecialist hospital thane
कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट

ठाणे - कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कोरोना आजाराची रुग्णांना भीती दाखवून खासगी रुग्णालयात लुटीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट; केवळ पीपीई कीटचे आकारले 27 हजार रुपये बिल

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढत्या संख्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे अन्य आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा फटका बसत आहे. काही खासगी रुग्णालयात अन्य आजाराच्या रुग्णांना रुग्णालये उपचारासाठी दाखल करुन घेत नाहीत. जर दाखल करुन घेतलेच तर त्या रुग्णांकडून अव्वाच्यासव्वा बिल उकळले जात असल्याचा प्रकार कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात समोर आला आहे.

metro star multispecialist hospital thane
पीपीई कीटचे आकारले 27 हजार रुपये बिल
या रुग्णालयात कल्याण पूर्वेत राहणारे रविंद्र राजभर हे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असलेल्या मेट्रो स्टार मल्टीस्पेशलीस्ट हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर रवींद्र यांना त्या खासगी रुग्णालयातील मॅनेजमेंटने उपचाराचे बिल त्याच्या हाती दिले. तेव्हा त्या बिलात तीन दिवसात पीपीई कीटचे 27 हजार रुपये आकारल्याचे नमूद केले. हा प्रकार राजभर यांच्या नातेवाईकांनी कल्याण पूर्व परिसरातील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगितला. त्यानंतर नगरसेवक महेश गायकवाड यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्या रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले.

रुग्णांकडून लूट केली तर गाठ माझ्याशी - नगरसेवक महेश गायकवाड


(मेट्रो) स्टार मल्टीस्पेशलीस्ट हाॅस्पिटलमध्ये रविंद्र राजभर हे उपचार घेत असताना त्यांना 3 दिवसाचे पीपीई किटचे 27 हजार रूपये घेवून कोरोनोच्या नावाने पैसे लुटत असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी मला कळवताच मी सहकाऱ्यासोबतच धाव घेऊन मेट्रो हाॅस्पिटलला दणका देत, बिलाची रक्कम कमी करून घेतली. यापुढे रूग्णांकडून जादा रक्कमेची लूट केली. तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही या खासगी हाॅस्पिटल प्रशासनाला दिल्याची माहिती नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 28, 2020, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.