महाराष्ट्र

maharashtra

Maratha Reservation: रात्री उशिरा जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद...एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना काय सांगितलं?

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 4:43 PM IST

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 15 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. तर मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात मंगळवारी रात्री फोनवरुन चर्चा झाली. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जातात का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Maratha Reservation
जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद

जालना :Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा खालावत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी मराठा समाजाच्या काही अटीसुद्धा मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, जोपर्यंत थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आंदोलन स्थळी येत नाही, तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही, असा पवित्रा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अवधीसुद्धा दिला आहे. या संदर्भात त्यांची रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा झाली आहे. सुमारे ही चर्चा सात ते आठ मिनिटे झाली. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः ही माहिती पत्रकारांना दिली आहे. यावेळी रात्री त्यांच्यासोबत सुमारे साडेदहा ते पावने अकरा वाजेच्या सुमारास मंत्री उदय सामंत,(Uday Samant) संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रत्यक्ष भेटून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. आता मुख्यमंत्री अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे यांचे उपोषण सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटी गावात : मराठा आरक्षणबाबत मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मंगळवारी सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटी गावात दाखल झाले होते. यावेळी राज्यातील सर्व विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना विनंती केली होती. मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) व माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट (Arjun Khotkar Meets Manoj Jarange Patil) घेत त्यांना विनंती केली की, सरकारला थोडा वेळ द्यावा. मराठा समाजाच्या सर्व अटी सरकार पूर्ण करणार आहे, असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलय.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation: सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; सरकारला थोडा वेळ द्यावा... अर्जुन खोतकर यांची विनंती
  2. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं; सर्वपक्षीय बैठकीत एकमतानं ठराव मंजूर
  3. Maratha reservation news: आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details