महाराष्ट्र

maharashtra

जालना स्टील कंपन्या तिसर्‍या लाटेतही कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सज्ज!

By

Published : Sep 23, 2021, 11:04 AM IST

Updated : Sep 24, 2021, 7:43 AM IST

जालना

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही जालन्यात ऑक्सिजन कमी पडणार नसल्याचं दिसत आहे. कारण, जालना स्टील मॅन्युफॅक्चुरींग असोसिएशनने गरजू रुग्णांना तिसऱ्या लाटेत मोफत ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्लांटही उभे केले आहेत.

जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला. जालन्यातील स्टील उद्योजक आता तिसऱ्या लाटेत देखील कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. गरजू रुग्णांना तिसऱ्या लाटेत मोफत ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय जालना स्टील मॅन्युफॅक्चुरींग असोसिएशनने घेतला आहे. सध्या जालन्यातील ५ स्टील कंपन्यांनी ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत. या सर्व प्लांटमधून दररोज १ हजार ५०० ते १ हजार ८०० ऑक्सिजन सिलेंडर रूग्णांना मोफत पुरवण्यात येणार आहे. अशी माहिती जालना स्टील मॅन्युफॅक्चुरींग असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

जालना स्टील कंपन्या तिसर्‍या लाटेतही कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सज्ज!
Last Updated :Sep 24, 2021, 7:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details