महाराष्ट्र

maharashtra

जालना पोलिसांना मिळतंय डायल 112 च प्रशिक्षण; आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना मिळणार मदत

By

Published : Oct 17, 2021, 10:35 PM IST

जालना जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना डायल 112 संदर्भात खास प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली असून, आतापर्यंत 120 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना डायल 112 चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. डायल 112 ही नवीन आपात्कालीन यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे.

training of dial 112 Jalna police
डायल 112 आपात्कालीन परिस्थितीत मदत

जालना -जालना जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना डायल 112 संदर्भात खास प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली असून, आतापर्यंत 120 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना डायल 112 चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. डायल 112 ही नवीन आपात्कालीन यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये लवकरच इतरही आपातकालीन सेवा समाविष्ट करण्यात येणार आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -एक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर सवलत देण्याचा निर्णय चर्चा करून घेऊ - आरोग्यमंत्री राजेश टोपे

जीपीएस प्रणालीद्वारे संकटात सापडलेल्या व्यक्तीस पोलीस यंत्रणेद्वारे मदत करण्यात येणार आहे. आपात्कालीन सेवांमध्ये पोलिसांच्या चारचाकी वाहनांमध्ये व दुचाकीमध्ये छोटे व मोठे टॅब बसवण्यात आलेले असून जालन्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 58 वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. यंत्रणा सध्या नवीन असल्यामुळे तिचे प्रशिक्षण देण्याचे काम नियंत्रण कक्षामार्फत चालू असून आतापर्यंत 120 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, अशी माहिती आज पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.

ही सेवा लवकरच जालन्यातील नागरिकांच्या सेवेला उपलब्ध असणार आहे. डायल 112 या आपात्कालीन फोननंबरमुळे प्रथम कॉल मुंबई येथे जाणार असून मुंबईहून संबंधित पोलीस स्टेशनला याची माहिती पोहोचणार असून, संकटात असलेल्या व्यक्तीस मदत मिळते आहे किंवा नाही याची देखील दखल पोलिसांकडून घेण्यात येणार आहे व याची माहिती मुंबई पोलिसांना देखील होणार आहे. त्यामुळे, आपात्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीस पोलिसांची मदत ही शंभर टक्के मिळणारच आहे. या सुविधेचा फायदा सर्व सामान्य माणसाला आता मिळणार आहे, आशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.

हेही वाचा -मदतीच्या बाबतीत केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देते - राजू शेट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details