ETV Bharat / state

मदतीच्या बाबतीत केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देते - राजू शेट्टी

author img

By

Published : Oct 11, 2021, 10:00 PM IST

जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला. पण, केंद्रीय पथक मागच्या आठवड्यात पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते, असे म्हणत अडीच महिन्यानंतर केंद्रीय पथक काय पाहणी करणार, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा तीनशे पट पाऊस झाला. अद्याप केंद्रीय पथक या ठिकाणी दाखल झालेले नाही. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे केंद्रीय पथक ज्यावेळी मराठवाड्यात पाण्याची टंचाई असेल, त्यावेळी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येईल, असे म्हणत राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

जालना - केंद्र सरकार मदत पथक पाठवण्याच्या व मदत देण्याच्या बाबतीत महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. मे महिन्यात आलेले वादळ महाराष्ट्रातून गुजरातकडे गेले. पण, केंद्राचे पथक केवळ गुजरातला पाहणीसाठी गेले आणि तब्बल बाराशे कोटीची मदत जाहीर केली, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

बोलताना राजू शेट्टी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा सुरू आहे. यावेळी जालना जिल्ह्यातील वाडिगोद्री येथे ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लाखीमपूर खीरी येथील घटनेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला.

पाणी टंचाईवेळी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येईल

जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात मोठा महापूर आला. पण, केंद्रीय पथक मागच्या आठवड्यात पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते, असे म्हणत अडीच महिन्यानंतर केंद्रीय पथक काय पाहणी करणार, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा तीनशे पट पाऊस झाला. अद्याप केंद्रीय पथक या ठिकाणी दाखल झालेले नाही. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे केंद्रीय पथक ज्यावेळी मराठवाड्यात पाण्याची टंचाई असेल, त्यावेळी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येईल, असे म्हणत राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

हजारो कोटींची तरतूद असताना मदत निधी मात्र गुजरातला

केंद्रीय राहत कोषची तरतूद आहे. देशात आपत्ती आल्यास त्यातील निधी खर्च करायचा असतो. हजारो कोटींची तरतूद असताना महाराष्ट्राला निधी न देता केवळ गुजरातला दिला जातो. याचाच अर्थ केंद्र सरकाची महाराष्ट्राकडे पाहण्याची भूमिका अतिशय उदासीन आहे, अशा शब्दात शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच एनडीआरफची मदत अंत्यत तुटपुंजी असून चौपट मदत दिली पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन निर्णय घेणे गरजेचे आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा - कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांना आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी ५ लाखांची अर्थिक मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.