महाराष्ट्र

maharashtra

RTPCR Test for Passengers : आरटीपीसीआर चाचणी करण्यासंदर्भातील 'तो' निर्णय लवकरच मागे घेणार - राजेश टोपे

By

Published : Dec 2, 2021, 4:08 PM IST

Updated : Dec 2, 2021, 4:47 PM IST

आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरटीपीसीआर चाचणी ( RTPCR Test for Passengers ) बंधनकारक करण्यात आली आहे. असा अध्यादेश 30 तारखेला राज्य सरकारकडून ( State Government ) काढण्यात आला होता. पण देशांतर्गत विमान प्रवास करताना आरटीपीसीआर नको, असे केंद्राचे आदेश आहेत. त्यामुळे मुख्यसचिव, मुख्यमंत्री, आरोग्य विभागाकडून ( Order of the Department of Health ) राज्य सरकारने काढलेला आदेश मागे घेण्याची विनंती केली होती. ही विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली असून आजच (गुरुवारी) हा आदेश मागे घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे.

जालना -परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी ( RTPCR Test for Passengers ) बंधनकारक करण्यात आली आहे. असा अध्यादेश 30 तारखेला राज्य सरकारकडून ( State Government ) काढण्यात आला होता. पण देशांतर्गत विमान प्रवास करताना आरटीपीसीआर नको, असे केंद्राचे आदेश आहेत. त्यामुळे मुख्यसचिव, मुख्यमंत्री, आरोग्य विभागाकडून ( Order of Health Department ) राज्य सरकारने काढलेला आदेश मागे घेण्याची विनंती केली होती. ही विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली असून आजच (गुरुवारी) हा आदेश मागे घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे

'नागरिकांनी लसीकरण करुन घेणे'

परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक आहे. त्यांनतर 7 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक असून 8 व्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर बंधनकारक आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. मात्र धोकादायक 11 देश वगळून इतर देशातून आलेल्या प्रवाशांसाठी हा नियम नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या आदेशात वेगळेपण राहणार नाही, असेही ते म्हणाले. राज्य सरकारने केंद्राकडे बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणासाठी आग्रह धरला आहे. अत्यावश्यक सेवेतील लोक, आरोग्य विभागातील कर्मचारी यांना बूस्टर डोस देण्यात यावा, अशी मागणी केंद्राकडे केली असून सिरमने सुद्धा DCGI कडे अशी मागणी केली आहे. केंद्राचा हा अधिकार असून राज्य सरकार त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायला तयार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. लसीकरण नाही तर टॅक्सीतुन प्रवास करता येणार नाही, असा कोणताही आदेश राज्य सरकारने काढलेला नाही. कायद्याला धरून नसलेले आदेश राज्य सरकार काढत नाही. मात्र लसीकरण करून घेणे ही आपली जबाबदारी असून लोकांना समजावून सांगून लसीकरण केले जात असल्याचे टोपे म्हणाले.

हेही वाचा -Zoo Authority Animal Deaths : राज्यातील 56 प्राणी संग्रहालयातील 200 प्राण्यांचा मृत्यू , पुण्याचा क्रमांक तिसरा

Last Updated :Dec 2, 2021, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details