महाराष्ट्र

maharashtra

Somaiya allegations on Arjun Khotkar : रामनगर साखर कारखान्यात भ्रष्टाचार; किरीट सोमैयांचा आरोप

By

Published : Dec 1, 2021, 3:49 PM IST

Kirit Somaiya

किरीट सोमैया आणि अर्जुन खोतकर यांच्या वादाला आज एक नवीन वळण मिळाले आहे. जालन्यात माजी खासदार किरीट सोमैया यांनी अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असलेल्या आस्थापनांना भेटी दिल्या. यात कृषी उत्पन्न बाजार समिती लालबाग सोसायटी रामनगर साखर कारखाना या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रामनगर साखर कारखान्यात भ्रष्टाचार ( Corruption in Ramnagar Sugar Factory ) झाल्याचा आरोप केला आहे.

जालना - २०१९ मध्ये जालन्यातील रामनगर साखर कारखान्याच्या गैरव्यवहाराची तक्रार झालेली होती. मात्र ठाकरे सरकारने अर्जुन खोतकर यांच्या या कारखान्याचा गैरव्यवहार दाबून टाकला. आता ईडीने या कारखान्याच्या खरेदीची चौकशी केल्याने 10 हजार शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमैया ( Kirit Somaiya allegations on Arjun Khotkar ) यांनी दिली आहे. सोमैया हे आज (बुधवार) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर ( Kirit Somaiya Jalna tour ) आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

किरीट सोमैयांची प्रतिक्रिया

किरीट सोमैया यांची विविध ठिकाणी भेट -

माजी खासदार किरीट सोमैया यांची आज जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, लालबाग, रामनगर आदी ठिकाणी भेट ( Kirit Somaiya Meet Ramnagar Sugar mill ) दिली. किरीट सोमैया आणि अर्जुन खोतकर यांच्या वादाला आज एक नवीन वळण मिळाले आहे. जालन्यात माजी खासदार किरीट सोमैया यांनी अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असलेल्या आस्थापनांना भेटी दिल्या. यात कृषी उत्पन्न बाजार समिती, लालबाग सोसायटी, रामनगर साखर कारखाना या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी रामनगर साखर कारखाना येथे कामगार आणि शेतकऱ्यांनी किरीट सोमैया यांची भेट घेतली तसेच शहरात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

किरीट सोमैयांचे आरोप -

नुकतीच किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. यात रामनगर सहकारी साखर कारखान्यात शंभर कोटींचा भ्रष्टाचार केला असून शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा दावा देखील सोमैया यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर जालन्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा -Face to Face Hasan Mushrif : 'विरोधकांना त्यांच्याच पद्धतीने उत्तरे देणार, तर सरकार पडण्याचे दावे फोल'

ABOUT THE AUTHOR

...view details