महाराष्ट्र

maharashtra

मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर, धरणाचे दोन दरवाजे उघडले

By

Published : Aug 30, 2020, 3:13 PM IST

जिल्ह्यात काल शनिवारी सायंकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. काल सायंकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाघूर धरणाची पाणीपातळी २३३.८०० मीटर झाली आहे. धरणात ९९.६० टक्के पाणीसाठा झाला आहे.

मुसळधार पावसामुळे वाघूर धरण ९९ टक्के भरले
मुसळधार पावसामुळे वाघूर धरण ९९ टक्के भरले

जळगाव- शहराला पाणी-पुरवठा होणाऱ्या वाघूर धरणात मुसळधार पावसामुळे ९९ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरण पूर्ण भरत आले असून त्याचे दोनही दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे, वाघूर नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे वाघूर धरण ९९ टक्के भरले

जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. काल सायंकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाघूर धरणाची पाणीपातळी २३३.८०० मीटर झाली आहे. धरणात ९९.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे धरणाचे दोनही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

धरणातून पाणी सोडल्याने वाघूर नदीला पूर आला आहे. दरम्यान, वाघूर धरण पूर्ण भरल्याने जळगाव शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संततधार सुरू राहिल्यास लवकरच पावसाची टक्केवारी १०० होणार आहे. चांगल्या पावसामुळे पिकांची वाढ जोमात होत आहे. दुसरीकडे मात्र उडीद, मुग पिकाचे नुकसान झाले आहे. पावसाने मध्यंतरी चार पाच दिवस खंड दिला. आता संततधार सुरू झाल्याने कपाशीचे पिके धोक्यात आले आहेे. पावसामुळे कपाशीचे कोंब खराब होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा-'हतनूर'चे 36 दरवाजे उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details