महाराष्ट्र

maharashtra

विहिरीत पडलेल्या आईला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचाही मृत्यू

By

Published : Sep 9, 2021, 10:44 PM IST

son try save mother died Anturli

जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे आईसह मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास घडली. नितीन पंढरीनाथ पाटील (वय 24) व प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय 45) अशी मृतांची नावे आहेत.

जळगाव -जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे आईसह मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास घडली. नितीन पंढरीनाथ पाटील (वय 24) व प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. प्रतिभा पाटील या आपल्या शेतातील विहिरीतून पाणी काढायला गेल्या होत्या. त्यावेळी पाय घसरल्याने त्या विहिरीत पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला नितीन याचाही आईसोबत बुडून मृत्यू झाला.

हेही वाचा -जामनेर तालुक्यातील 35 हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, 250 घरांचीही पडझड!

नेमके काय घडले?

अंतुर्ली येथील रहिवासी असलेले पंढरीनाथ पाटील यांचे गावाजवळ शेत आहे. आज सकाळी त्यांचा मुलगा नितीन व पत्नी प्रतिभा हे दोघे जण पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतात गेले होते. फवारणी करताना पंपासाठी लागणारे पाणी घेण्यासाठी प्रतिभा पाटील दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीवर गेल्या होत्या. विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. आई विहिरीत पडल्याचे पाहून मुलगा नितीन पाटील याने विहिरीकडे धाव घेतली. आईला वाचवण्यासाठी त्याने देखील विहिरीत उडी घेतली. दरम्यान, विहिरीत गाळ असल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पट्टीच्या पोहणाऱ्यांनी विहिरीतून काढले दोघांचे मृतदेह

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पाटील यांच्या शेतात धाव घेतली. तब्बल दोन तासानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांना दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. दोघांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दोघांनी आत्महत्या केल्याची पसरली होती माहिती

ही घटना उजेडात आल्यानंतर सुरुवातीला आईसह मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पसरली होती. मात्र, पोलिसांनी पाटील कुटुंबीयांसह काही ग्रामस्थांचे जबाब नोंदवले. त्यानंतर घटनेची खरी माहिती समोर आली. दरम्यान, 3 वर्षांपूर्वी नितीनच्या भावाचा देखील विहिरीत पडून मृत्यू झाला होता, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. या घटनेमुळे अंतुर्ली गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा -बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला, उपचाराअभावी चिमुकल्या आरुषीचा जीव गेला

ABOUT THE AUTHOR

...view details