महाराष्ट्र

maharashtra

Hingoli Crime : तपासणीस आलेल्या महिलेसोबत डॉक्टराचे अश्‍लील चाळे; वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना

By

Published : Jan 31, 2022, 2:54 PM IST

तपासणीसाठी आलेल्या एका महिलेसोबत एका डॉक्टरने अश्‍लील चाळे करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ओंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात घडली. गणेश बड्रेवार असे डॉक्टरच नाव आहे. महिलेच्या फिर्यादीवरून ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली
Hingoli Crime

हिंगोली - ओंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका महिलेसोबत एका डॉक्टरने अश्‍लील चाळे करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बड्रेवार असे डॉक्टरच नाव आहे. ताब्यात घेतलेल्या डॉक्टरची कसून चोकशी केली जात आहे.

पीडिता गेली होती तपासणीसाठी -

पीडित महिला ही गरोदर असून, ती 30 जानेवारी रोजी साडेअकरा वाजता आपल्या नंनदसह ओंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. तेव्हा महिला सिस्टर कर्तव्य बजावत होती. तर सिस्टरने डॉ. गणेश बड्रेवार याच्याकडे तपासणीसाठी पाठविले. डिलिव्हरी रुममध्ये तपासणीसाठी महिलेला नेल्यांनंतर महिलेची नंनद दरवाजावर थांबली होती. डॉक्टर तपासणी करून आल्यानंतर नंनदेसोबत देखील अश्लील भाषा वापरली.

गरोदर महिलेची तपासणी करताना केले अश्लील चाळे -

गरोदर महिलेची तपासणी करत असताना डॉक्टरने पीडितेसोबत अश्लील चाळे केले, तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या महिलेचा विनयभंग देखील केला. या संपूर्ण प्रकाराने महिला चांगलीच गोंधळून गेली. एवढे होऊन ही कुछ नही होता, असे म्हणून अश्लील चाळे करतच होता. गोंधळून गेलेली महिला बाहेर धावत आली अन् कर्तव्यावर आलेल्या सिस्टरला सांगितले. तसेच पिडितीने हा संपूर्ण प्रकार भावाला फोनवरून सांगितला. त्याने लगेच रुग्णालयात धाव घेऊन बहिणीला ओंढा पोलीस ठाण्यात नेत फिर्याद दिली.

यापूर्वी देखील कळमनुरी रुग्णालयात घडला होता प्रकार -

सदरील डॉक्टर हा चांगलाच रंगेल असून या पूर्वी देखील कळमनुरी रुग्णालयात कार्यरत असताना, असाच प्रकार केला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाणार तोच माफी मागितल्याने या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. तसेच हा डॉक्टर रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला सिस्टरसोबत देखील अश्लील भाषा वापरतो. मात्र, नोकरी जाण्याच्या भीती पोटी बऱ्याच महिला या डॉक्टरचा त्रास सहन करत असल्याचे ओंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोनी वैजनाथ मुंढे यांनी सांगितले.

हेही वाचा -President's Address : पारंपारिक औषधांचे जागतिक केंद्र भारतात होत आहे - राष्ट्रपती

ABOUT THE AUTHOR

...view details