ETV Bharat / bharat

President's Address : पारंपारिक औषधांचे जागतिक केंद्र भारतात होत आहे - राष्ट्रपती

author img

By

Published : Jan 31, 2022, 12:54 PM IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केले. सुरुवातीला राष्ट्रपतींनी सांगितले की भारतात औषधांचे जागतिक केंद्र होत आहे. (who global centre for traditional medicine in india)

President's address in Parliament
राष्ट्रपतींचे संसदेत अभिभाषण

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे की, जगातील पहिले डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन - पारंपारिक औषधांचे जागतिक केंद्र भारत बनणार आहे. ते म्हणाले डब्ल्यूएचओ महानिदेशक यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये या संदर्भात घोषणा केली होती.

कोरोना लसीकरणात भारताने 150 करोड नागरीकांना लस देऊन मोठे काम केले आहे. त्यामुळे भारत सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशाच्या यादीत सहभागी झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण सुध्दा 70 टक्या पेक्षा जास्त झाले आहे.

मार्च, 2021 मध्ये ग्लोबल आयुर्वेद फेस्टिवल (Global Ayurveda Festival) मधे पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी सांगितलेकी आयुर्वेदिक उत्पादनांची जागतिक मागणी सतत वाढत आहे. डब्ल्यूएचओ ने भारतातील पारंपरिक औषधी केंद्र (who global centre for traditional medicine in india) स्थापन केले आहे. मार्च, 2021 मध्ये ही पंतप्रधानांनी आयुर्वेद आणि परंपरागत अभ्यासासाठी भारतातील विद्यार्थ्यांचा उल्लेख केला होता.

  • लाखो स्वातंत्र्यसैनिकांना नमन

राष्ट्रपतींनी सुरवातीलाच सांगितले की, मी त्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांना नमन करतो ज्यांनी त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिले आणि भारताला हक्क मिळवून देण्यासाठी मदत केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारताच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचेही मी आदरपूर्वक स्मरण करतो.

  • लोकशाहीचा आधार म्हणजे लोकांचा आदर करणे

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, त्यांचा आदर्श समाज हा स्वातंत्र्य, समता आणि समरसतेवर आधारित असेल. लोकशाही हा केवळ सरकारचा एक प्रकार नाही तर लोकशाहीचा आधार म्हणजे लोकांचा आदर करणे. माझे सरकार बाबासाहेबांच्या आदर्शांना आपले मार्गदर्शक तत्व मानतो

  • जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम राबवला

कोणीही उपाशीपोटी घरी परतणार नाही याची खात्री करण्यासाठी, माझे सरकार दर महिन्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा भाग म्हणून गरिबांना मोफत रेशनचे वाटप करते. आज भारत जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम राबवत आहे. पीएम गरीब कल्याण योजनेची मुदत मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.

  • सैनिक शाळांत आता मुलींनाही प्रवेश सुरु

सर्व 33 सैनिक शाळांनी आता मुलींनाही प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे ही आनंदाची बाब आहे. नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मध्ये महिला कॅडेट्सच्या प्रवेशालाही सरकारने मान्यता दिली आहे. महिला कॅडेट्सची पहिली तुकडी जून 2022 मध्ये NDA मध्ये येईल. मुले आणि मुलींना समान दर्जा प्रदान करून, माझ्या सरकारने महिलांचे लग्न करण्यासाठी किमान वय १८ वर्षे वाढवून पुरुषांप्रमाणेच २१ वर्षे करण्याचे विधेयक सादर केले आहे.

  • महिला सक्षमीकरण सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक

महिला सक्षमीकरण हे माझ्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. उज्ज्वला योजनेच्या यशाचे आम्ही साक्षीदार आहोत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांच्या उद्योजकतेला आणि कौशल्यांना चालना मिळाली आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे अनेक सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.

  • स्थानिक भाषांना प्रोत्साहन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून स्थानिक भाषांना प्रोत्साहन दिले जात आहे; महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा भारतीय भाषांमध्ये घेण्यावर भर दिला जात आहे. 10 राज्यांमधील 19 अभियांत्रिकी महाविद्यालये या वर्षी 6 भारतीय भाषांमध्ये शिकवतील.

  • 28 लाख विक्रेत्यांना 2900 कोटींपेक्षा जास्तची मदत

रस्त्यावरील विक्रेत्यांना फायदा व्हावा यासाठी माझे सरकार पीएम स्वानिधी योजना चालवत आहे. आतापर्यंत 28 लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची आर्थिक मदत मिळाली आहे. सरकार आता या विक्रेत्यांना ऑनलाइन कंपन्यांशी जोडत आहे. तसेच माझ्या सरकारने जन धन-आधार-मोबाईल, जेएएम ट्रिनिटी यांना नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी ज्या पद्धतीने जोडले त्याचा परिणाम आपण पाहू शकतो. 44 कोटींहून अधिक गरीब नागरिकांना बँकिंग प्रणालीशी जोडून महामारीच्या काळात करोडो लाभार्थ्यांना थेट रोख हस्तांतरणाचा लाभ मिळाला.

  • देशाच्या जडणघडणीत अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा

देशाच्या जडणघडणीत आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे; माझ्या सरकारने नेहमीच 80% लहान शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या 11 कोटी कुटुंबांना लाभ झाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.