महाराष्ट्र

maharashtra

MLA Santosh Bangar Join Shinde Group : उद्धव ठाकरेंसाठी अश्रू ढाळले अन् आता शिंदेंच्या गटात गेले

By

Published : Jul 4, 2022, 8:24 PM IST

Shiv Sena MLA Santosh Bangar Shinde, who was in tears, joined the group

कळमनुरीचे मतदार संघाचे आमदार संतोष बांगर हे शिंदे ( CM Eknath Shinde ) गटात सामील झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावर निर्माण झाले आहे. ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्या बायका त्यांना सोडून जातील, तसेच त्यांच्या मुलांना मुली देखील कोणी देणार नाही असे बांगर ओक्षा बोक्शी रडत सांगत सुटले होते. मात्र, तेच संतोष बांगर ( MLA Santosh Bangar ) आता शिंदेगटासोबत गेल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

हिंगोली -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी बंड पुकारल्या नंतर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar ) हे मुंबईवरून परत आल्यानंतर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला होता. सत्कारा दरम्यांन आ. बांगर यांनी रडू पडून आपल्या कार्यकर्त्यांना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांना सोडून गेलेल्या आमदारांना कसा त्रास होईल हे सांगत सुटले होते. मात्र, आता हेच संतोष बांगर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच गोंधळून गेले आहेत.

अश्रू अनावर झालेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर शिंदे गटाच सामील

राजकीय वर्तुळात एकच बांगर यांची चर्चा -शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासु, खंदे समर्थक, निकटवर्तीय म्हणून कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडे पाहिले जायचे. तसे त्यानी करूनही दाखवले होते. मुंबईवरून हिंगोलीत परत आल्यानंतर त्यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत परत येण्यासाठी भावनिक विनंती देखील केली होती. एवढच काय तर, ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्या बायका त्यांना सोडून जातील, तसेच त्यांच्या मुलांना मुली देखील कोणी देणार नसल्याचे आ. संतोष बांगर ओक्षा बोक्शी रडत सांगत सुटले होते. मात्र, तेच संतोष बांगर आता शिंदेगटासोबत गेल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला प्रवास -शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय प्रवास सुरू झाला होता. संतोष बांगर यांचे काम पाहून अवघ्या थोड्याच दिवसांमध्ये त्यांना हिंगोलीचे जिल्हा पक्षप्रमुख पद देण्यात आले होते. त्यानंतर संतोष बांगर यांनी मोठ्या तळमळीने सेना वाढीसाठी जिल्ह्यामध्ये परिश्रम घेतले. तर, काही शिवसैनीकानी बांगर यांच्यावर नाराजी व्यक्त करीत शिवसेनेला सोड चिठी दिली. मात्र, हेच संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहेत. ईडीच्या दबावाने तर, बांगर यांनी शिंदे गटाकडे धाव घेतली नसावी ? अशी चर्चा सध्या त्यांच्या कार्यकर्यांमध्ये सुरू आहे.आ. बांगर यांनी उद्धव ठाकरे यांची सेना सोडल्याने भविष्यात त्यांचा फायदा नेमका कुणाला होणार, तसेच त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते कुणाच्या बाजूने जाणार हे येणाऱ्या काळातच ठरेल.

हेही वाचा -Maharashtra Floor Test Result : मुख्यमंत्री पक्षाचा नसतो, तो राज्याचा असतो- बाळासाहेब थोरात

ABOUT THE AUTHOR

...view details