महाराष्ट्र

maharashtra

संविधानाने दिलेला अधिकार बजावण्यासाठी आणि प्रत्यक्षात पाहणीसाठी आलोय - राज्यपाल

By

Published : Aug 6, 2021, 2:13 PM IST

Review meeting of the Governor held in Hingoli

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून (गुरूवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले. शासकीय विश्रामगृह येथे दाखल होताच त्यांचे पोलीस प्रशासनाच्यावतीने सलामी देऊन स्वागत करण्यात आले. कोश्यारी यांनी यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला.

हिंगोली - संविधानाने जो मला अधिकार दिलेला आहे तो मी बजावण्यासाठी प्रत्यक्षात हिंगोली येथे आलो आहे. जिल्ह्यात जो काही सिंचन प्रश्न आहे, त्याची नेमकी काय परिस्थिती आहे. तो पूर्णत्वास गेला की अपूर्ण राहिला आहे, हे पाहण्यासाठी मी हिंगोली येथे आलो असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

राज्यपालांनी हिंगोलीत घेतली आढावा बैठक

जिल्ह्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आलो -

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून (गुरूवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले. ते शासकीय विश्रामगृह येथे दाखल होताच त्यांचे पोलीस प्रशासनाच्यावतीने सलामी देण्यात आली. कोश्यारी यांनी यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. तर मुख्य बाब म्हणजे जिल्ह्यातील सिंचन प्रश्नावर अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. नंतर राज्यपाल यांनी प्रसार माध्यमच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधून, संविधानाने दिलेला अधिकार बजावण्यासाठी आपण दौऱ्यावर आलो असल्याचे त्यांनी पत्रकारांशी सांगितले. येथील सिंचन प्रश्न कसा आहे, किती वाढ झाली, अपूर्ण राहण्याची कारणे काय आहेत, याचा संपूर्ण आढावा घेऊन हा प्रश्नशासनाकडे मांडणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील इतर प्रश्नांचा देखील आढावा घेतला. हे सर्वच प्रश्न राज्य व केंद्र शासनाकडे मांडणार असल्याचे राज्यपाल यांनी सांगितले. तर जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारण्यासंदर्भात विचारणा करताच हा माझा अधिकार नसल्याचे राज्यपालांनी सांगितले.

ऐन वेळेवर देण्यात आली माजी आमदाराला पास

ऐन वेळेवर देण्यात आली माजी आमदाराला पास -

राज्यपाल यांना भेटण्यास कुणालाही परवानगी दिलेली नव्हती, शासकीय विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच निवेदन पोलीस प्रशासनाच्यावतीने स्वीकारून त्याची नोंद घेण्यात येत होती. तर माजी आमदार गजानन घुगे हे राज्यपालांच्या भेटीसाठी आले असता त्यांना पोलिसांनी अडवले होते. मात्र, त्यांचे पास तात्काळ जाग्यावरच बनवण्यात आले होते. तेव्हा कुठे त्यांना आत प्रवेश देण्यात आला होता.

हेही वाचा - राज्यपालांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास भेट देवून घेतले पायरीचे दर्शन

हिंगोली जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र कमी -

हिंगोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र हे 35 टक्के पेक्षा कमी आहे. अन् अनुशेष हा मोठा आहे. त्यामुळे हे क्षेत्र कसे वाढेल यासाठी मी केंद्र व राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा करणार आहे. जेणेकरून येथे सिंचन क्षेत्र जर वाढले तर निश्चितच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे ठरेल असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले.

हेही वाचा -मातृभाषेतून ज्ञानाची होणारी उकल अधिक सुलभ आणि महत्वाची - राज्यपाल

ABOUT THE AUTHOR

...view details