महाराष्ट्र

maharashtra

police On action mode : मद्य प्रेमींनो सावधान पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

By

Published : Dec 31, 2022, 1:50 PM IST

police On action mode

नववर्षाचे स्वागत (Welcome to New Year) दरवर्षीच मोठ्या उत्साहात केले जाते. मात्र दोन वर्षे कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे तो उत्साह नव्हता यावेळी मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी तयारी पहायला मिळत आहे. पण मद्यप्रेमींनी सावधानता बाळगली (Alcohol lovers beware) नाही, अतिउत्साह दाखवला तर मात्ल्यार पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर (police on action mode) असल्याचे पहायला मिळत आहे.Alcohol lovers beware police on action mode

हिंगोली : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा सगळी कडे मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. शहरी भागात अलीशान सोसायट्या मोठमोठी हाॅटेल्स, तसेच खासगी फार्म हाऊस अशा विविध ठिकाणी मित्र मंडळींसोबत थर्टी फस्ट मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या निमित्ताने हाॅटेल्स आणि अनेक विध संस्था वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात, त्यासाठी वेगवेगदळ्या अ‍ॅाफर्सही दिल्या जातात त्याची जाहिर जाहिरातबाजीही केली जाते. हा प्रकार आता ग्रामीण भागातही पहायला मिळत आहे. पार्टीच्या उत्साहात नियमांचे उल्लंघन होउ नये यासाठी पोलीस प्रशासन पण सज्ज झाले आहे. पार्टी करणाऱ्यांनी सावधानता बाळगली नाही तर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आहेत

सरत्या वर्षाला निरोप देताना उती उत्साही तरूणांकडून नियमांचा भंग होऊ नये यासाठी पोलीसांनी जिल्ह्यातील विविध भागांत वेगवेगळे पथके तयार करुन ते तैनात केले आहेत. त्यामुळे आपल्याकडून कोणतेही चुकीचे कृत्य घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे होऊ नये याची काळजी मध्यप्रेमींनाच घ्यावी लागणार आहे. तसे न झाल्यास कारवाई होउ शकते त्यामुळे आधीच काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केरण्यात आले आहे.


नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात ध्वनीक्षेप वापरण्याच्या वेळेची त्याच बरोबर ध्वनी प्रदुषन होउ नये यासाठी आखुन दिलेल्या डिसेबलच्या मर्यादेचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. तर मध्य प्राशन करून वाहने चालवल्यास अशांवरही कारवाई करण्यासाठी पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासह दोन विभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक असे एकूण 55 पोलीस अधिकारी तर 363 पोलीस अंमलदार 1 एस आर पी कंपनी 2 आर सी पी पथक दहशतवाद विरोधी शाखा, बी. डी. डी. एस यांचे पथक, 250 होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली असून मध्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे तर हिंगोली शहरांमध्ये आठ ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्त व वाहन तपासणी करण्यात येणार आहे. ब्रेथ अँनालायझर मशीनद्वारे तपासणी करून मध्ये प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वर कारवाई केली जाणार आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाकडून अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details